Pune News : लग्न करण्यास नकार दिल्याने महिलेकडून तरुणाचे अपहरण, पुणे पोलिसांकडून तिघांना अटक

Pune Kidnapping News : पुणे पोलिसांनी तरुणाची गुजरातमधून सुटका केली आहे.
Pune Crime News
Pune Crime News Saam TV
Published On

अक्षय बडवे

Pune News : पुण्यातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालली आहे. कालच विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आज लग्न करण्यास नकार दिल्यामुळे महिलेने केले चक्क तरुणाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 पुणे पोलिसांनी तरुणाची गुजरातमधून सुटका केली आहे. महिलेने तरुणाचे अपहण करण्यासाठी 2 जणांना सुपारी दिल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील कोंढवे धावडे परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणी एका महिलेसह प्रथमेश यादव, अक्षय कोळी यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळ सोलापूरचा असलेला 23 वर्षीय तरुण गुजरातमधील वापी या ठिकाणी एका खाजगी कंपनीमध्ये कामाला आहे. त्याचा भाऊ पुण्यातील एनडीए रस्ता परिसरात राहायला आहे. त्या तरुणाचे एका 28 वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते.  (Crime News)

Pune Crime News
Attacked on Girl in Pune : कोयत्याने वार होत असतानाही मैत्रिणीसाठी 'तो' ढाल बनला, आभार मानताना पीडितेच्या आईला अश्रू अनावर

मात्र तरुणाच्या आई-वडिलांनी त्याचा विवाह ठरवण्यासाठी त्याला सोलापूरला बोलावून घेतले. त्यामुळे नोकरी सोडून तो सोलापूरला निघून गेला. प्रेमसंबंध तोडल्याने विवाहित महिला संतापली होती. त्यानंतर महिलेने तरुणाचे अपहरण करण्याचा कट रचला.  (Latest Marathi News)

Pune Crime News
Mumbai Water Cut: मुंबईकर, पाणी जपून वापरा! भर पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा; शनिवारपासून १० टक्के पाणीकपात

यासाठी प्रोफेशनल अपहरणकर्त्यांना तिने पैसे दिले. एनडीए रस्त्यावरील कोढवे धावडे परिसरातून चार दिवसांपूर्वी महिलेसह तिच्या साथीदारांनी त्या तरुणाचे अपहरण केले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासात आरोपी गुजरातमधील वापी परिसरात असल्याची माहिती मिळताच वापी येथे जाऊन एका हॉटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com