Mumbai Water Cut: मुंबईकर, पाणी जपून वापरा! भर पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा; शनिवारपासून १० टक्के पाणीकपात

Mumbai Water Supply: दमदार पावसाळा सुरू झाला असला तरी मुंबईकरांवर ऐन पावसाळ्यात पाणी कपातीचे संकट ओढावले आहे.
Mumbai Water supply
Mumbai Water supplySaam Tv
Published On

Mumbai Rain Update: राज्यासह देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात तर पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मुंबईत गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. तसेच काही भागात पहिल्याच पावसात पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ झाल्याचेही पाहायला मिळाले.

मात्र, दमदार पावसाळा सुरू झाला असला तरी मुंबईकरांवर ऐन पावसाळ्यात पाणी कपातीचे संकट ओढावले आहे. पाऊस असूनही तलावांची पातळी ७ टक्क्यांच्या खाली गेल्याने शनिवारपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Mumbai Water supply
Gondia Rain News: गोंदिया जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! नाल्यावरील रस्ता ओलांडताना पुरात वाहून ५० वर्षीय इसमाचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, जुलैमध्ये मुंबईकरांना 10% पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. कारण पाणलोट क्षेत्रात मध्यम पाऊस पडत आहे. बीएमसीचे प्रमुख आय एस चहल यांनी मंगळवारी याबाबतचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की "त्यांनी हायड्रोलिक विभागाने प्रस्तावित केलेल्या 10% पाणीकपातीला मान्यता दिली आहे. सिडको बुधवारपासून पुरवठा क्षेत्रात १५ टक्के कपात करणार आहे."

मंगळवारी सकाळी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये राखीव साठा वगळून वर्षभरासाठी आवश्यक असलेल्या १४ लाख दशलक्ष लिटर साठ्यापैकी ६.९७% साठा होता. मुंबईत मंगळवारी हलका पाऊस झाला. बुधवारसाठी, एकाकी ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देणारा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

Mumbai Water supply
Raigad Breaking: आंबेनळी घाटात दरड कोसळली; पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक ठप्प

दरम्यान, यंदा दोन आठवड्यांच्या विलंबानंतर रविवारी मुंबईत मान्सून सुरूझाला. तेव्हापासून शहरात 344 मिमी पाऊस झाला असून जून महिन्यातील पावसाची तूट 25% इतकी आहे. जून महिन्यात सरासरी 526.3 मिमी पावसाची गरज आहे.

IMD मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, "उर्वरित आठवड्यात पाऊस सुरू राहण्यासाठी सिनोप्टिक परिस्थिती अजूनही अनुकूल आहे. "उत्तर छत्तीसगड आणि आजूबाजूला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तीन दिवसांत ते पश्चिम वायव्येकडून वायव्य मध्य प्रदेशाकडे सरकण्याची दाट शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com