Mumbai Traffic Jam: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यावर ट्राफिक जाम तर रेल्वे वाहतूक उशिराने; ऑफिसला जाणाऱ्यांचे हाल

Mumbai Road Traffic And Local Delayed: लोकल सेवा (Mumbai Local) उशिरा असल्यामुळे आणि ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे मुंबईकरांना ऑफिसला जायला उशिर होत आहे
Mumbai Road Traffic And Local Delayed
Mumbai Road Traffic And Local DelayedSaam Tv
Published On

Mumbai News: मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस (Mumbai Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळे मुंबईच्या लोकसेवेवर परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. लोकल सेवा (Mumbai Local) उशिरा असल्यामुळे आणि ट्राफिकमध्ये अडकल्यामुळे मुंबईकरांना ऑफिसला जायला उशिर होत आहे. त्यामुळे आज त्यांना लेटमार्क लागणार आहे.

Mumbai Road Traffic And Local Delayed
Raj Thackeray News : पुण्यातील तरुणीवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना, प्रशासनाचेही कान टोचले

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये सतत पडणारा पाऊस, अर्धवट राहिलेली रस्त्यांची कामे यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंलुंड टोल नाक्यावर ठाण्यावरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

तर नवी मुंबईतल्या तळोजा, शिळफाटा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीचा सामना कामावर निघालेल्या प्रवाशांना करावा लागत आहे. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून काहीच प्रयत्न केले जात नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

Mumbai Road Traffic And Local Delayed
Mumbai News: चाकरमान्यांना मनस्ताप! पळसदरी स्टेशन जवळ क्रॉसिंग पॉईंट फेल; पुणे-मुंबई वाहतूक खोळंबली

तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरु आहे. मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिराने सुरु आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.

लोकल उशिराने धावत असल्यामुळे मुंबईकरांना ऑफीस गाठताना समास्यांचा सामना करावा लागणार आहे. लोकलची सेवा उशिराने सुरु असल्यामुळे अनेक जण रिक्षा किंवा टॅक्सीचा पर्याय निवड आहेत. पण ट्राफिकमुळे त्यांना ऑफिसला जायला उशिर होत आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे.

Mumbai Road Traffic And Local Delayed
वाहतुकदारांनाे ! Mumbai Pune Expressway वरुन जाणार आहात ? जिल्हाधिका-यांचा नवा आदेश वाचा

दरम्यान, मुंबईमध्ये पुढचे तीन ते चार तास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी अशे आवाहन केले जात आहे. रात्रभर देखील मुंबईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com