Sambhaji Bhide News: वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजी भिडेंचा अजब सल्ला; म्हणाले, पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेताना धोतरच घालून यावं!

Sambhaji Bhide Controversial Statement: संभाजी भिडे यांनी वारकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांनी धोतर घालूनच विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी यावे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.
Sambhaji Bhide Controversial Statement
Sambhaji Bhide Controversial StatementSaam TV

Sambhaji Bhide Controversial Statement: शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे मोठा वाद देखील निर्माण होतो. आता संभाजी भिडे यांनी वारकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांनी धोतर घालूनच विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी यावे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही, तर पंढरपुरात ड्रेसकोड लागू करावा, अशी मागणी सुद्धा भिडे यांनी केली आहे.

Sambhaji Bhide Controversial Statement
Pradeep Kurulkar: प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप प्रकरणात मोठा ट्विस्ट; डीआरडीओकडून झाली मोठी चूक

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या या मागणीमुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्यांच्या या मागणीमुळे वारकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. संभाजी भिडे आज पंढपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.

यावेळी बोलताना संभाजी भिडे म्हणाले, मला संत महंतांना आणि वारकरी मंडळींना सांगायचं आहे, की पँट घालून पंढरपूरमध्ये (Pandharpur) यायचं नाही, तसंच विठ्ठल मंदिरात सुद्धा प्रवेश करायचा नाही, वारकरी भक्तांनी धोतरच घालून मंदिरात यावे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

धोतर हे सर्व संताचा महंतांचा पोशाख आहे. पँट हे ब्रिटिशांचा वेश आहे. त्यामुळे संस्कृती राखून वारकरी भक्तांनी पंढरपुरात व मंदिरात यावे. वारीत (Ashadhi Ekadashi) येताना असा वेश नको, पंढरपूरमध्ये तातडीने ड्रेसकोड लागू करण्यात यावा, अशी मागणी सुद्धा संभाजी भिडे यांनी केली आहे.

Sambhaji Bhide Controversial Statement
Nashik Crime News: शेतजमिनीचा वाद विकोपाला, सासऱ्याचं चुलत सुनेसोबत भयानक कृत्य; धक्कादायक घटनेनं नाशिक हादरलं

आरपीआयकडून भिडेंचा धोतर जाळून निषेध

दरम्यान, काल-परवाच संभाजी भिडे यांनी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्यदिनाबद्दल भाष्य केलं होतं. १५ ऑगस्ट हाआपला स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करावा, लोकांनी उपवास करावा, असं विधान भिडे यांनी केलं होतं.

त्यांच्या या विधानानंतर आरपीआय आठवले गट आक्रमक झाला आहे. साताऱ्यात आरपीआयने आंदोलन सुरू केलं असून धोतर जाळत भिडे यांचा निषेधही करण्यात आला. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा 2 दिवसांमध्ये सातारा बंद करणार, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com