Mumbai News
Mumbai News Yandex
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईत शौचालयाच्या टाकीत गुदमरुन दोन कामगांराचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईच्या मालाडमधून (Malad) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मालाड येथील एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या शौचालयाची टाकी स्वच्छ करण्यासाठी ४ कामगारांपैकी दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,तर इतर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम परिसरात बुधवार २५ एप्रिल रोजी घडली.मालाड पश्चिमेतील रत्नागिरी हॉटेलजवळील रहेजा टॉवर या इमारतीचे बांधकाम (Construction) सुरु आहे. या बांधकामादरम्यान इमारतीच्या परिसरातील शौचालयाची टाकी स्वच्छ करण्यासाठी ४ कामगार उतरले होते. मात्र टाकीत उतरल्यापासून बराच वेळ झाल्यानंतरही ते कामगार बाहेर आले नाही. टाकीच्या खोली जास्त असल्याने बांधकाम परिसरातील इतक कामगारांनी अग्निशमन दलास बोलवले.

अग्निशमन (fire fighting)दलाच्या कर्मचाऱ्यांना त्यावेळी तीन कामगार बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यानंतर तातडीने त्यांना जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यातील दोघांचा मृत्यू झाला होता आणि एकाची प्रकृती चिंताजनक होती. या घटनेत राजू(वय ५०) आणि जावेद शेख (३५) यांचा मृत्यू झाला आहे.,तर अकीब शेख(१९) याती प्रकृती चिंताजनक आहे.

या घटनेतील हे सर्व कामगार खासगी कंत्राटदाराचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शिवाय खासगी कंत्राटदाराने कोणतीही सुरक्षिततेची साधने न देता त्यांना टाकीत उतरविल्यामुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता आहे.सध्या या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत असून घटनेतील जो कोणी दोषी आहे त्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Scheme For Women: महिलांनो, स्वतः चा व्यवसाय सुरु करायचाय? सरकारच्या 'या' योजनेत मिळेल कर्ज

Supreme Court : मतांची टक्केवारी वेबसाईटवर जाहीर करण्यास अडचण काय? सुप्रीम कोर्टाचा आयोगाला सवाल

Curd Benefits: वजन कमी करण्यासाठी खा दही, होतील अनेक फायदे

Pune Crime: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी खुनाचा थरार! डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या; कोंढव्यातील घटना

Today's Marathi News Live: भिंडेच्या कंपनीचे दादरमध्ये ८ अनधिकृत होर्डिंग

SCROLL FOR NEXT