टॉयलेटमध्ये घुसून महिला वकिलाचा विनयभंग; तरुणाचं धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ
Mumbai Latest Crime News Saam TV

Mumbai News: टॉयलेटमध्ये घुसून महिला वकिलाचा विनयभंग; तरुणाचं धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ

Mumbai Crime News: शॉपिंग मॉलच्या टॉयलेटमध्ये घुसून एका २१ वर्षीय तरुणाने महिला वकिलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असता, आरोपीने तिच्या पोटात लाथ मारली. ही संतापजनक घटना दक्षिण मुंबईत घडली.
Published on

Mumbai Latest Crime News

शॉपिंग मॉलच्या टॉयलेटमध्ये घुसून एका २१ वर्षीय तरुणाने महिला वकिलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असता, आरोपीने तिच्या पोटात लाथ मारली. इतकंच नाही, तर त्याने महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. ही संतापजनक घटना दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक परिसरातील अशोका शॉपिंग सेंटरमध्ये घडली.

टॉयलेटमध्ये घुसून महिला वकिलाचा विनयभंग; तरुणाचं धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ
Crime News: छत्रपती संभाजीनगरमध्ये अभियंता तरुणीवर अत्याचार, धर्म बदलून लग्नही लावले, तिघांविरोधात गुन्हा

याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केलं असता, २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रामशंकर गौतम उर्फ संदीप पांडे (वय २१) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पेशाने वकील असून दक्षिण मुंबईतील (Mumbai News) लोकमान्य टिळक मार्गावरील अशोका शॉपिंग सेंटरजवळ तिचे ऑफिस आहे. शुक्रवारी (ता. १९) सकाळी साडेसातच्या सुमारास महिला शॉपिंग सेंटरमधील कॉमन टॉयलेटमध्ये गेली होती.

यावेळी आरोपी तरुण हा टॉयलेटमध्ये उपस्थित होता. महिलेने त्याला व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगितले. आरोपीने बाहेर गेल्यासारखं केलं. पण जेव्हा महिला टॉयलेटला गेली, तेव्हा तो पुन्हा आतमध्ये आला. त्याने दरवाजा आतून लावून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

महिलेने आरडाओरड केली असता, आरोपीने तिचा गळा दाबला. इतकंच नाही, तर त्याने महिलेच्या पोटात लाथ मारुन तिला खाली देखील पाडलं. घटनेनंतर आरोपी तिथून फरार झाला. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

टॉयलेटमध्ये घुसून महिला वकिलाचा विनयभंग; तरुणाचं धक्कादायक कृत्य, मुंबईत खळबळ
Mumbai News : बोगस डॉक्टरने केला तरुणीवर बलात्कार, नालासोपार्‍यातील घटनेने खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com