मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर १ ऑक्टोबरपासून १२ डब्यांच्या १० गाड्यांचे रुपांतर १५ डब्यांत करण्यात येणार आहे. तसेच १२ फेऱ्यांची संख्या देखील वाढवली जाणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांची लोकल धावणार असल्याने त्यामुळे प्रवाशांचा प्रवास वेळेत होणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या १९९ फेऱ्या धावत असल्याची माहिती मिळत आहे. आता यामध्ये १ ऑक्टोबरपासून आणखी वाढ होणार आहे. आता १२ डब्यांच्या १० लोकल आता १५ डब्यांची करणार आहे. त्यामुळे १५ डब्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार असून त्याची संख्या २०९ इतकी होणार आहे. या लोकल अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेने धावणार आहेत. या वाढीव फेऱ्यामुळे पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या १३९४ वरून आता १४०६ इतकी होणार आहे.
पूर्व सीएसएमटी-बोरिवली हार्बर मार्गावर वापरण्यात येणाारा रेक देखील चर्चगेट ते विरार मार्गावर पाठवण्यात येणार आहे. तर चर्चगेट ते विरारदरम्यान १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे. यामुळे विरार ते चर्चगेट या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर १५ डब्यांची लोकल ट्रेन धावत असताना मध्य आणि हार्बर मार्गावर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्यांची संख्या कमी करण्याची मागणी केली जात आहे. या मार्गावरील प्रवास सुकर होण्यासाठी प्रवासी संघटना सातत्याने आवाज उचलत आहेत. पश्चिम रेल्वे १५ डब्यांची लोकल ट्रेन धावत असताना मध्य रेल्वेवर कधी धावणार, असा सवाल प्रवासी संघटना उपस्थित करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.