Mumbai metro news | बॅटरी-चलित शन्टरने पहिल्या ८ डब्यांच्या मेट्रो मार्ग-३ ट्रेनची यशस्वी जुळवणी

मुंबई मेट्रो-३ मार्गाच्या कामाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग-३ साठी ८ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन बॅटरी-चलित शन्टरने यशस्वीपणे जोडली आहे.
Mumbai metro news
Mumbai metro newssaam tv
Published On

रुपाली बडवे

Mumbai metro news : मुंबई मेट्रो-३ मार्गाच्या कामाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग-३ साठी ८ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन बॅटरी-चलित शन्टरने यशस्वीपणे जोडली आहे. आज, सोमवारी ८ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन बॅटरी जोडण्यात आली आहे. मुंबई (Mumbai) मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या कार डेपोसाठी ही पहिली खरेदी करण्यात आली आहे.

Mumbai metro news
आपल्याला सत्याच्या बाजूने राहायचं आहे, सत्तेच्या नव्हे; आदित्य ठाकरेंचा नव्या कार्यकर्त्यांना सल्ला

या शन्टरने मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनद्वारे सारीपूत नगर, आरे, येथे "ट्रेन डिलिव्हरी आणि चाचणी ट्रेकसाठी उभारलेल्या तात्पुरत्या सुविधेमध्ये पहिल्या ८ डब्यांच्या ट्रेनची जुळवणी करण्यात आली आहे. या छोट्या अद्भूत शन्टरची क्षमता ३५० टन वजन खेचण्याची आहे. बॅटरी पूर्णपणे चार्ज असताना हे शन्टर ८ डब्यांची ट्रेन ९ कि.मी.पर्यंत खेचू शकते.

सदर शन्टर सतत ५० किलो न्यूटन क्षमतेने काम करू शकते.या शन्टरची त्याच्या स्वयंचलित कप्लर तसेच अर्धस्थायी कप्लर अडॉप्टरसह यशस्वीरीत्या चाचणी करण्यात आली. दोन्ही कप्लर मेट्रो डबे जोडण्यासाठी वापरले जातात. ठाणे येथील मे. रेनमॅक इंडिया प्रा.लि. यांनी नेदरलँड्सच्या एन.आय.टी.इ.क्यू. संस्थेसोबतच्या संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करारांतर्गत मेक-इन-इंडियाच्या धोरणाचा एक भाग म्हणून या रेल कम रोड शन्टरची पूर्णपणे निर्मिती केली आहे.

Mumbai metro news
Maharashtra Cabinet Expansion: भाजपच्या या '४' आमदारांना मंत्रिपद फिक्स

दरम्यान, मेट्रो ३ चा सीप्झ ते बीकेसी असा पहिला टप्पा २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएमआरसीने ठेवले आहे. सदर उद्दिष्ट गाठण्यासाठी कारशेडचा प्रश्न मार्गी लावणे अत्यंत गरजेचे होते.शिंदे सरकारने आरेत कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कारशेडचे कामही लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com