Western Railway 300 Local Train Cancel Saam Tv
मुंबई/पुणे

Western Railway : पश्चिम रेल्वेवर 'या' दिवशी ३०० लोकल रद्द! नेमकं कारण काय? जाणून घ्या

Western Railway 300 Local Train Cancel : डिसेंबरच्या सुट्ट्यांदरम्यान पश्चिम रेल्वेवरील कांदिवली – बोरिवली सहाव्या मार्गाच्या कामामुळे २७ डिसेंबर रोजी ३०० लोकल फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. २६ ते २७ डिसेंबर दरम्यान काही लोकल फक्त गोरेगावपर्यंत धावतील.

Alisha Khedekar

  • २७ डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर ३०० लोकल फेऱ्या रद्द.

  • कांदिवली – बोरिवली सहाव्या मार्गाच्या नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉकमुळे सेवा प्रभावित.

  • २६ डिसेंबर रात्री ११ ते २७ डिसेंबर सकाळी ७ पर्यंत ब्लॉक.

  • गोरेगाव पर्यंतच धावणाऱ्या लोकल

डिसेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी लागोपाठ सुट्ट्या आल्या आहेत. यानिमित्ताने पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणी भेट देतील. मात्र जर तुम्ही येत्या २६ आणि २७ डिसेंबर रोजी लोकलमधून प्रवास करणार असाल, तर त्याआधी ही बातमी वाचा. पश्चिम रेल्वेवरील कांदिवली – बोरिवलीदरम्यान सुरू असलेल्या सहाव्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे २७ डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवरील ३०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. शिवाय पनवेल येथे ३० डिसेंबर पर्यंत रेल्वे ब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस – बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. कांदिवली – बोरिवलीदरम्यान पायाभूत कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी २० डिसेंबरपासून पुढील ३० दिवस वाहतूक ब्लाॅक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक १८ जानेवारी २०२६ पर्यंत आहे. या ब्लॉकमुळे २६ डिसेंबर रोजी रात्री ११ पासून २७ डिसेंबर रोजी सकाळी ७ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर बोरिवली येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पॅनल कार्यान्वित करण्यासाठी एक मोठा नॉन-इंटर लॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे.

तसेच २६ डिसेंबर रोजी रात्री ११ पासून २७ डिसेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत कांदिवली – दहिसरदरम्यान डाऊन जलद मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली आणि अंधेरीच्या काही लोकल गोरेगावपर्यंतच धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

या मार्गावरील सुमारे ३०० लोकल फेऱ्या २७ डिसेंबर रोजी रद्द करण्यात येतील. यामध्ये अप, डाऊन, जलद, धीम्या लोकल सेवांचा समावेश असेल. तर, बोरिवलीपर्यंत धावणाऱ्या १४ लोकल फेऱ्या गोरेगावपर्यंत चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत अंधेरीच्या काही लोकल सेवा फक्त गोरेगावपर्यंतच धावतील. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेरगावी जाणाऱ्या आणि मुंबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकांना या ब्लॉकचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT