Thane-Navi Mumbai Pre Monsoon Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Thane-Navi Mumbai Rain: नवी मुंबई- ठाण्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

Thane-Navi Mumbai Pre Monsoon Rain: ठाणे आणि नवीपूर्वी मुंबईतील अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

Priya More

वाढते तापमान आणि उकाड्यामुळे हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मान्सून (Monsoon 2024) येत्या काही तासांमध्येच मुंबईमध्ये (Mumbai Rain) दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिक आनंदी आहेत. अशामध्ये ठाणे आणि नवी मुंबईमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. पण या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून ठाणे शहरात ढगाळ वातावरण होते. काही वेळापूर्वी ठाण्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली. उकाड्यामुळे ठाणेकर हैराण झाले होते. पण या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे ठाणेकर आनंदी झाले आहेत. तर दुसरीकडे नवी मुंबईमध्ये देखील मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली आहे. बेलापूर, खारघर, खांदा कॉलनी आणि नवी पनवेलमध्ये पाऊस पडत आहे. काही ठिकाणी चांगलाच पाऊस पडत आहे. या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. सकाळी १० वाजल्यापासून पाऊस पडत आहे. मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे सिंधुदुर्गकरांचा गोंधळ उडाला. हवामान विभागाकडून कोकणाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तर हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. पुढच्या तीन दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. त्याचबरोबर समुद्रामध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर असे वेगाने वारे वाहतील असा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Politics : 'पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली'; सत्ताधारी महिला आमदाराचा सभागृहात खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update: पुण्यात शॉक सर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; कोणतीही जीवितहानी नाही

Fact Check : अमरावतीच्या छत्री तलावाजवळ भूत? युवकाला बेदम चोपला, वाढदिवसाच्या पार्टीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT