Navi Mumbai: अंत्यसंस्काराची लाकडं लाटली, न्हावे ग्रामपंचायतीत घाेटाळा? रायगड जिल्हाधिका-यांकडे तक्रार

complaint about nhave gram panchayat :
complaint about nhave gram panchayat former sarpach in raigad collector office
complaint about nhave gram panchayat former sarpach in raigad collector officeSaam Digital

- सिद्धेश म्हात्रे

स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ओएनजीसी कंपनीकडून मदत स्वरूपात घेतलेली लाकडे न्हावे गावच्या माजी सरपंचाने एका बेकरी व्यावसायिकाला दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते वैभव म्हात्रे यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे सखाेल चाैकशीची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केले आहे.

विशेष म्हणजे ही लाकडे घेतल्याची कोणतीही नोंद ग्रामपंचायतच्या दप्तरी नाही. मात्र ओएनजीसी व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीने केलेल्या विनंतीनुसार या लाकडांचा पुरवठा केल्याचे दास्तावेज ओएनजीसी कडून प्राप्त झालेत.

complaint about nhave gram panchayat former sarpach in raigad collector office
Rise In Vegetables Price: काय सांगता! 3 महिने भाजीपाल्याचे दर चढेच राहणार? जाणून घ्या मुंबईसह पुण्यातील दर (Video)

सामाजिक कार्यकर्ते वैभव म्हात्रे यांना प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकारातुन या स्मशानभूमी घोटाळ्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे अशी माहिती वैभव म्हात्रे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

complaint about nhave gram panchayat former sarpach in raigad collector office
कल्याणमधील नालेसफाईवर आमदार भाेईर नाराज, KDMC अधिका-यांना 5 दिवसांचा अल्टीमेटम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com