MUMBAI WATER STORAGE DROPS BY 111 MILLION LITRES IN 24 HOURS AS MONSOON TAKES A BREAK Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : राज्यात पावसाची विश्रांती, मुंबईच्या पाणीसाठ्यात १११ दशलक्ष लिटरची घट; नागरिकांची चिंता वाढली

Mumbai Water Crisis Update News : राज्यात पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्यात २४ तासांत १११ दशलक्ष लिटरची घट.

Alisha Khedekar

  • मुंबईच्या सात तलावांतील पाणीसाठ्यात घट

  • तानसा, मोडक सागर आणि विहार तलावांमध्ये पाणीपातळी कमी झाली

  • विहार तलावातील साठ्यात सुमारे ६० हजार दशलक्ष लिटरची घट

राज्यात गेले काही दिवस पावसाने दडी मारलेली पाहायला मिळाली. जुलै महिन्याच्या सुरुवातीचे ८ दिवस पावसाने चांगला जोर धरला होता, मात्र त्यानंतर राज्यात ऊन सावलीचा लपंडाव पाहायला मिळाला. गेल्या आठवडा भरात झालेल्या पावसाने मुंबईतील काही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे मुंबईकरांचे पाणी कपातीचे टेन्शन संपले होते. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठ्यात पुन्हा घट झाली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण ७ लाख २२ हजार ६४९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र १४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता घेतलेल्या आढाव्यानुसार हा साठा ७ लाख २२ हजार ५३८ दशलक्ष लिटरपर्यंत खाली आला. म्हणजेच अवघ्या २४ तासांत सुमारे १११ दशलक्ष लिटर पाण्याची घट नोंदवण्यात आली आहे.

सध्या ही घट कमी वाटत असली तरी पाऊस आणखी काही दिवस उशिराने आला तर पाणीसाठा झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः तानसा, मोडक सागर आणि विहार या तलावांमध्ये पाण्याची पातळी घटल्याचे दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यात ओसंडून वाहू लागलेल्या विहार तलावातही आता पाणीसाठा कमी झाला असून, त्यामध्ये सुमारे ६० हजार दशलक्ष लिटरची घट झाल्याची नोंद आहे. धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस पडणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या नातीसाठी चांदीच्या पैंजणाचे 5 लेटेस्ट डिझाईन्स

Bullet Train: भारतात धावणार आणखी 3 बुलेट ट्रेन; 12 तासांचा प्रवास आता होणार 2 तासांत? वाचा सरकारचा मास्टरप्लान

Maharashtra News Live Update: विनायक राऊत आणि गितेश राऊत यांच्या अडचणीत वाढ

High Court : महिलेची सलवार काढणे अन् छातीला स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नाही; हायकोर्टाची टिप्पणी

Crime News: नागपूर हादरले! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी

SCROLL FOR NEXT