Mumbai Water Stock News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Water Stock News: मुंबईकरांना दिलासा! तूर्तास पाणीकपातीचं संकट टळलं; ७ तलावांमध्ये फक्त इतकाच पाणीसाठा

Mumbai News: सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मुंबईकरांसाठी येत्या ३१ जुलैपर्यंत वापरण्यात येईल इतका जलसाठा उपलब्ध आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. मुंबईकरांसाठी येत्या ३१ जुलैपर्यंत वापरण्यात येईल इतका जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने उपलब्ध जलसाठा आणि राखीव जलसाठ्याचा वापर करण्याचे नियोजन केले आहे. पाणीसाठ्याचे प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई (Mumbai)महापालिकेने केले आहे.

पाणीकपाक टळली....

मुंबईकरांना सात धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र या धरणांत गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. या धरणांतील पाणीसाठा मिळून साधारण १६.४८ टक्के पाणी साठा आहे. मात्र मुंबईकरांनी काळजी करु नये. पंरतू पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करावा. यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान(weather) खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पाणी कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

या मंगळवारपर्यंत सात तलावांमधील पाण्यासाठ्याची पातळी १६.४८टक्क्यापर्यंत पोहचली आहे.मात्र गेल्या वर्षीच्या ७ मे राजीपर्यंत तलावांमध्ये २२.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता,तर २०२२मध्ये २५.८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता,अशी बीएमसीची आकडेवारी आहे.

दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यातील पाणीसाठा साधारण २० ते २५ टक्क्यापर्यंत असतो, असे अधिकांऱ्यानी सांगितले आहे. मात्र मुंबई महानगरपालिका प्रशासन पाणी कपात करण्यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाशी संवाद साधणार आहे. यापूर्वी देखभालीच्या कामांमुळे मुंबई शहरांतील अनेक भागात साधारण १ महिन्यांत १५ ते ३० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. मुंबईला दररोज ४,२०० एमएलडी पाण्याची गरज असते. पंरतू मुंबई पालिका ३,८५० एमएलडीचा पाणी पुरवठा करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT