Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Naigaon News : वसईमध्ये भयंकर घटना, १० हजार किलो काचेचा ढिग अंगावर कोसळला; २ कामगारांचा मृत्यू

Vasai Naigaon : नायगाव येथील काच कारखान्यात १० हजार किलो काचेची थप्पी कोसळून बालकामगारासह एका कामगाराचा मृत्यू झाला. या दुघटनेमुळे बालकामगार कायद्याचे उल्लंघन उघड झाले आहे.

Alisha Khedekar

  • नायगाव ससूपाडा काच कारखान्यात १० हजार किलो काचेची थप्पी कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

  • मृतांमध्ये एका अल्पवयीन कामगाराचाही समावेश

  • कारखाना मालकाविरुद्ध निष्काळजीपणाने मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल

  • औद्योगिक सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष आणि बालकामगार कायद्याचे उल्लंघन उघड

नायगाव पूर्वेच्या ससूपाडा येथील राडाजी प्रा. लिमिटेड संभाजी इंडस्ट्री या काच उत्पादन करणाऱ्या कारखान्यात मंगळवारी संध्याकाळी एक भीषण दुर्घटना घडली. कारखान्यातील काचेची तब्बल १० हजार किलो वजनाची थप्पी अचानक कोसळून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका अल्पवयीन कामगाराचाही समावेश असल्याने ही घटना अधिकच गंभीर ठरली आहे. मृतांची नावे कशिश यादव (१७) आणि अक्रम अख्तर अली खान (२७) अशी आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आणि बालकामगारांच्या रोजगाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही गेल्या काही महिन्यांपासून कारखान्यात काम करत होते. मंगळवारी संध्याकाळी कारखान्याच्या मालकांनी त्यांना काचेची मोठी थप्पी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे काम दिले होते. या थप्पीचे वजन तब्बल १० हजार किलो होते. काम सुरू असतानाच अज्ञात कारणामुळे काचेची रचना असंतुलित झाली आणि ती पूर्णपणे त्यांच्या अंगावर कोसळली. वजनाचा आणि धक्क्याचा तडाखा एवढा जबरदस्त होता की दोघेही काचेच्या तुकड्याखाली गाडले गेले. त्या क्षणीच काचा तुटून त्यांच्या शरीरात घुसल्या, त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच रक्तबंबाळ अवस्थेत होते.

कारखान्यातील सहकाऱ्यांनी तातडीने मदत करून दोघांना काचेच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि नायगाव येथील निळकंठ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही उपचारादरम्यान मृत घोषित केले. अपघातानंतर कारखान्याच्या सुरक्षेची साधने, कामगारांच्या सुरक्षिततेसाठीच्या सुविधा आणि भारवाहन प्रक्रियेतील निष्काळजीपणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या घटनेनंतर नायगाव पोलीस ठाण्यात कारखान्याच्या मालक आणि संबंधित जबाबदारांवर निष्काळजीपणाने मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मृतांपैकी एक अल्पवयीन असल्याने बालकामगार कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोपही होत आहे. कामगार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करत पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, कारखान्यात वारंवार सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. मोठ्या वजनाचे साहित्य हलवण्यासाठी पुरेशी साधने नसल्यामुळे अशा अपघातांचा धोका कायम असतो. काही कामगारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कामाचा दबाव, पुरेशी विश्रांती नसणे आणि सुरक्षाविषयक साधनांचा अभाव ही रोजचीच समस्या आहे.

औद्योगिक सुरक्षेचे नियम कागदावरच राहिले असून, प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांचे जीव धोक्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात कडक उपाययोजना करण्याची मागणी होत असून, तपास सुरू आहे. अशा प्रकारच्या औद्योगिक दुर्घटना टाळण्यासाठी कठोर देखरेख, योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षा साधनांची उपलब्धता अत्यावश्यक आहे. या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की औद्योगिक उत्पादनाच्या शर्यतीत कामगारांच्या जीविताची किंमत दुर्लक्षित करता कामा नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: पवईत घराची भिंत कोसळली, १ जण गंभीर जखमी

Nitesh Rane : वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे; वाळू चोरीवरून मंत्री नितेश राणे आक्रमक

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, कार डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली, ६ मित्रांचा मृत्यू

Jalna : स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्याच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने घातली लाथ, व्हिडीओ व्हायरल

Chanakya Niti : लग्नानंतर प्रेम कमी होऊ नये म्हणून हा गुपित मंत्र

SCROLL FOR NEXT