Metro Line 3 Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी खूशखबर, अंडरग्राउंड मेट्रो ३ दिवसांत धावणार; कुठून अन् कशी? वाचा तिकिट दर

Mumbai Metro line 3: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेचे उदघाटन करणार आहेत.

Namdeo Kumbhar

Mumbai Metro : मेट्रो फेज ३ ची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचं आणि पहिल्या अंडरग्राउंटॉड फेजचे उदघाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर रोजी ठाणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोच्या तिसऱ्या फेजचे उदघाटन करतील. मुंबईकर आरे-वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) यादरम्यान मुंबईकरांचा प्रवास सूकर होणार आहे. (Mumbai Metro 3: Inauguration Date and Operational Readiness)

12.5 किलोमीटर लांब असलेल्या या मेट्रो लाइनवर दहा स्टेशन असतील. या मेट्रो लाइनचा उर्वरित भाग मार्च २०२५ पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो लाइन दक्षिण मुंबईमध्ये कुलाबापर्यंत जामार आहे. 33.5 किलोमीटर लांब असणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्ज मेट्रो मार्गाचे लोकार्पण 26 ऑगस्ट 2014 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन केंद्रीय शहरी विकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले होते. या कॉरीडोरचं काम 21 ऑक्टोबर 2016 पासून सुरु झालं होतं. (Mumbai Metro Aqua Line – Info, Route Map, Fares, Tenders & Updates)

मुंबई मेट्रो फेज-3 स्टेशनची नावे कोणती? The stations for Mumbai Metro Line 3 include:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो

जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो (मुंबई सेंट्रल मेट्रो)

विज्ञान केंद्र (विज्ञान संग्रहालय)

शीतला देवी मंदिर

वांद्रे कॉलोनी (विद्यानगरी)

सांताक्रूझ मेट्रो

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टी1

सहार रोड

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टी2

एमआयडीसी - अंधेरी

आरे जेवीएलआर

तिकिट किती असेल? Mumbai Metro 3 ticket price

मुंबईची पहिली आणि महाराष्ट्रातील दुसरी अंडरग्राउंड मेट्रो (कुलाबा-ब्रांदा-सीप्ज) याची एकूण लांबी 33.5 किलोमीटर इतकी आहे. हा मेट्रो मार्ग दक्षिण मुंबईला जोडणारा पहिला मेट्रो कॉरिडोर असेल. मेट्रो-3 मधील पहिला टप्पा सुरु होणा आहे. मुंबई मेट्रोचा हा चौथा मार्ग असेल. सध्या या कॉरिडॉरचा 12.44 किमीचा भाग सुरु केला जाणार आहे. यावर एकूण 10 स्थानके आहेत. काही स्थानकांच्या नावांमध्येही बदल करण्यात आलाय. याचं तिकिट १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यत असेल.

मेट्रोची वेळ काय ? mumbai metro line 3 timings

या मार्गावरील मेट्रो सकाळी साडे सहा ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत धावणार आहेत. विकेंडला सकाळी साडेआठ वाजता पहिली मेट्रो धावेल, रात्री साडे दहा वाजता अखेरची मेट्रो असेल. या मार्गावर मेट्रोच्या प्रतिदिवस ९६ फेऱ्या असतील.

आठ डब्ब्याच्या प्रत्येक मेट्रोमधून एकाचवेळी अडीच हजार प्रवाशी जातील, असा एमएमआरसीएल अधिकाऱ्यांना अंदाज आहे. प्रत्येक सात मिनिटांला मेट्रो धावेल. आरे-बीकेसी मार्गावर तिकिटाचे दर दहा रुपये ते ५० रुपये यादरम्यान असेल.

मेट्रो अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना तिकिट क्यूआर कोड आणि पेपेर तिकिटामार्फत उपलब्ध असेल. एनसीएमसी कार्ड थोड्या दिवसानंतर सुरुवात होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT