Mumbai Traffic Police News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : लिओनेल मेस्सी आज मुंबईत, शहरातील वाहतुकीत मोठा बदल, वाचा पर्यायी मार्ग कोणते?

Lionel Messi GOAT India Tour Mumbai Visit : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या GOAT इंडिया टूर निमित्त मुंबईत मोठे वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. वानखेडे व ब्रेबॉर्न स्टेडियम परिसरात पार्किंग बंद असून मुंबई पोलिसांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Alisha Khedekar

  • लिओनेल मेस्सी GOAT इंडिया टूरच्या निमित्ताने आज मुंबईत येणार

  • वानखेडे व ब्रेबॉर्न स्टेडियम परिसरात ट्रॅफिक बदल

  • स्टेडियमवर पार्किंग बंद; पे अँड पार्क सुविधा उपलब्ध

  • मुंबई पोलिसांचा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला

स्टार फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) "GOAT इंडिया टूर 2025" निमित्त सध्या भारत दौऱ्यावर आहे. मेस्सी या भारत दौऱ्या दरम्यान कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरांना भेट देणार आहे. काल शनिवार (ता. १३) रोजी लिओनेल मेस्सीने कोलकाता येथे भेट दिली असून, आज (ता. १४) रोजी मुंबईत हजेरी लावणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

यापूर्वी लिओनेल मेस्सी हा २०११ रोजी भारतात आला होता. त्यानंतर आता तब्ब्ल १४ वर्षानंतर मेस्सी भारत दौऱ्यावर आला आहे. दरम्यान आज लिओनेल मेस्सी मुंबईत येणार असून यानिमित्त मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत मोठा बदल केला असून त्याचे पालन करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील रहिवाशांना आणि प्रवाशांना वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या GOAT इंडिया टूर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. संध्याकाळी ५ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला मेस्सीच्या चाहत्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, त्यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर स्टेडियमवर पार्किंगला परवानगी नसल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. सी, डी, ई, एफ, जी रस्ते, वीर नरिमन रोड, दिनशा वाच्छा रोड, जमशेदजी टाटा रोड आणि एन.एस. रोडवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

तसेच डी रोड (पश्चिम-पूर्व), ई रोड (दक्षिण दिशेने); वीर नरिमन रोडवर एकतर्फी रस्ते वाहतूक सुरू राहणार आहे. तर कोस्टल रोड (मरीन ड्राइव्ह-वरळी/तारदेव) आणि चंद्र बोस रोड. या मार्गांवर बंदी घालण्यात आली असून प्रमुख चौकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

शिवाय स्टेडियमवर पार्किंगला निर्बंध असल्याने चर्चगेट, एचटी पारेख मार्ग, दोराबजी टाटा रोड, जमनालाल बजाज मार्ग, विधान भवनजवळ पे अँड पार्क सुविधा लागू करण्यात आली आहे. यासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहे. वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा आणि स्टेडियमकडे गाडी चालवून जाणे टाळा. असे म्हटले असून वाहतूक वळवण्याची व्यवस्था दुपारी १२:०० ते रात्री ११:०० पर्यंत लागू राहील, असे सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahanagarpalika Election: युतीची चर्चा झाल्यानंतर शिंदे खेळणार नवा डाव; जागावाटपावरून शिवसेना देणार भाजपला चेकमेट

लग्नाचं आनंदी वातावरण क्षणात दुःखात बदललं; डीजेच्या आवाजाने १४ वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Maharashtra Live News Update: पुणे शहराला मिळाले ५ नवीन पोलीस ठाणे

U19 Asia Cup 2025 : नाद करायचा नाय! भारताने पाकिस्तानचा ९० धावांनी धुव्वा उवडला; दीपेश आणि कनिष्कची गोलंदाजी ठरली गेमचेंजर

Lionel Messi: लिओनेल मेस्सीला क्रिकेटच्या देवानं दिली खास भेट; वानखेडेवर गुंजला सचिन अन् मेस्सीच्या नावाचा गजर

SCROLL FOR NEXT