Maharashtra Education : राज्यातील शिक्षण क्षेत्रात खेळखंडोबा! जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त

Nagpur News : राज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सरकारवर टीका केली. शिवाय चंद्रपूरात ४७२ पदे रिक्त असल्याची खळबळजनक माहिती त्यांनी दिली
Maharashtra Education : राज्यातील शिक्षण क्षेत्रात खेळखंडोबा! जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त
Nagpur NewsSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त

  • काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आरोप केला.

  • सरकारने मात्र फक्त १५ हजार पदे रिक्त असल्याचे सांगितल्यामुळे वाद निर्माण झाला

  • चंद्रपूरात ७ वर्गांसाठी फक्त ३ शिक्षक असल्याचे गंभीर वास्तव वडेट्टीवारांनी मांडले

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे सरकारने या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आज मागणी केली.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.एकीकडे शिक्षकांची पद रिक्त आहे दुसरीकडे राज्यात ५५ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या बातम्या येतात.शिक्षण हा इतका महत्वाचा विषय असूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.

Maharashtra Education : राज्यातील शिक्षण क्षेत्रात खेळखंडोबा! जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त
Today Weather : महाराष्ट्र गारठला! परभणीत पारा ५.५ अंशावर, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, आज कसं राहिलं हवामान?

चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांची पद रिक्त आहे.सात वर्ग आणि फक्त तीन शिक्षक विद्यार्थी काय शिकणार? त्यामुळे सरकारने राज्यात शिक्षकांची किती पद रिक्त आहेत, आणि एका मर्यादित कालावधीत या जागा भराव्या अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यात १५ हजार शिक्षकांची पद रिक्त असल्याची माहिती सभागृहात दिली यावर वडेट्टीवर यांनी आक्षेप घेतला.

Maharashtra Education : राज्यातील शिक्षण क्षेत्रात खेळखंडोबा! जिल्हा परिषद शाळांमध्ये ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त
Today Weather : राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, जाणून घ्या IMDचा इशारा

राज्यात ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त आहेत,अधिकारी सरकारची दिशाभूल करत आहे,सरकारच्या पोर्टलचे नाव पवित्र असले तरी अपवित्र काम सुरू आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी सभागृहात केली. या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री गोरे यांनी मान्य केले चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांची ४७२ जागा रिक्त आहेत. राज्यात शिक्षक भरतीबाबत नवीन पद्धत आणण्याची गरज असल्याचे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com