mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Traffic : मुंबईतील महत्वाच्या पुलावरील वाहतुकीत मोठा बदल, पर्यायी मार्ग काय? जाणून घ्या

Mumbai Worli Bridge One Way : मुंबईतील वरळी शंकरराव नरम पथ ब्रिजवरील काँक्रिटीकरणाच्या कामामुळे ७ डिसेंबरपर्यंत एकेरी वाहतूक राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.

Alisha Khedekar

  • वरळी ब्रिजवरील वाहतूक ७ डिसेंबरपर्यंत एकेरी राहणार आहे

  • काँक्रिटीकरणामुळे रस्त्याचा अर्धा भाग बंद करण्यात आला आहे

  • वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत

  • वाहतूक पोलिसांनी सुरक्षित वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे

मुंबईकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील वरळी येथील शंकरराव नरम पथ या ब्रिजवरील गाड्या ७ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्रीपर्यंत एका बाजूने चालू राहणार आहेत. हा मार्ग २४ तास सुरु राहणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान पुलाच्या या कामामुळे मुंबईकरांना मोठा फटका बसू नये म्हणून पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वरळी येथील शंकरराव नरम पथ या ब्रिजवरून तात्पुरती एकेरी वाहतूक सेवा सुरु राहणार आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणादरम्यान वाहतूक व्यवस्थापित करण्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं वाहतूक पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान गणपतराव कदम मार्ग ते पांडुरंग बुधकर मार्गापर्यंत हा एकेरी मार्ग चोवीस तास सुरु राहणार आहे. १२ मीटर रस्त्याचा अर्धा भाग सध्या खोदण्यात आला असून त्यामुळे गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. हा एकेरी मार्ग डिसेंबर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत सुरु राहणार आहे.

प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे :

  • डॉ. ॲनी बेझंट रोडवरून वाहतूक पांडुरंग बुधकर मार्गे - कुरणे चौक - गोपाळनगर जंक्शन - दीपक टॉकीज - एनएम जोशी रोड - एसएल मतकर मार्ग - सेनापती बापट रोड

  • पोदार जंक्शन पासून वरळी नाका मार्गे आणि डावीकडे गणपतराव कदम मार्गावर

  • कोस्टल रोड/सी लिंक वरून बिंदू माधव जंक्शन - पोदार जंक्शन - वरळी नाका - गणपतराव कदम

या सर्व मार्गांवरून वाहतुकीचा पर्यायी मार्ग उपलब्ध राहणार आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणादरम्यान वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना सुरक्षितरित्या गाड्या चालवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; कोणत्या भागातला पाणीपुरवठा राहणार बंद?

Maharashtra Live News Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरगावमध्ये होणार मुख्यमंत्र्यांची सभा

Election Commission : निवडणूक यादीतील घोळाची सत्ताधाऱ्यांना झळ; विरोधीपक्षानंतर भाजपने घेतली हरकत, नेमकं काय घडलं?

Dr Gauri Gajge Case: डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या की हत्या? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Mangalsutra Importance: काळा रंग अशुभ मानतात, तरीही मंगळसूत्राचे मणी काळे का असतात?

SCROLL FOR NEXT