Mumbai - Thane Traffic Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Traffic: मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा थरार रंगणार, वाहतुकीत मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Mumbai - Thane Traffic Changes: दहीहंडीनिमित्त मुंबई आणि ठाण्यात वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Priya More
  • मुंबई दहीहंडी २०२६ मुळे वाहतुकीत मोटे बदल

  • दहीहंडीमुळे मुंबईतील अनेक रस्ते बंद राहणार

  • वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग सांगितले

  • ठाण्यात दहीहंडी उत्सवासाठी वाहतूक बदल

मुंबईमध्ये दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे. दहीहंडीनिमित्त मुंबई शहरातील वाहतुकीवर परिणाम होणार आहे. या निमित्ताने मुंबईत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. गोविंदा पथकांची गर्दी, दहीहंडीचे कार्यक्रम आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरातील अनेक रस्ते बंद केले असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

मुंबईतील अनेक रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. जरीमरी रोडवर दहीहंडीचा कार्यक्रम होणार असल्यामुळे शनिवारी सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जरीमरी रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. एस. व्ही. रोडवरून दक्षिणेकडून हिल रोडच्या दिशेने जरीमरी रोडमार्गे जाणाऱ्या वाहनांना याठिकाणी प्रवेश बंदी असेल. या वाहनांना विठ्ठल मंदिर सिग्नल येथून यू-टर्न घ्यावा लागेल. त्यानंतर या वाहनांना एस. व्ही. रोडनं उत्तरेकडे जाऊन डॉ. व्ही. रघुनाथ मार्ग, सेंट मार्टिन रोड आणि पुढे हिल रोडचा वापर करता येईल.

घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांच्याकडून दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी घाटकोपरमध्ये वाहतुकीत अनेक बदल करण्यात आले आहेत. अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील श्रेयस जंक्शन ते भीमनगर जंक्शनदरम्यानचा दक्षिणेकडील मार्ग सकाळी ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद राहणार आहे. श्रेयस जंक्शनहून असल्फाकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. या वाहनांनी एलबीएस रोडच्या दक्षिणेकडील मार्गानं पुढे जावं. सर्वोदय जंक्शन येथे उजवीकडे वळून हिराचंद देसाई रोडमार्गे असल्फाच्या दिशेनं जावे. पुढे अंधेरी-घाटकोपर लिंक रोडला जोडता येणार आहे.

ठाण्यात वाहतूक मार्गात मोठे बदल -

दहीहंडी उत्सवादरम्यान ठाणे शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिसांनी १७ प्रमुख ठिकाणी वाहतुकीत बदल केले आहेत. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. टेंभी नाका, टॉवर नाका, संकल्प चौक, वागळे इस्टेट आणि बाळकुम, काशिनाथ घाणेकर यांसारख्या प्रमुख ठिकाणी गोविंदा पथक तसेच नागरिकांची गर्दी होणार असल्याने काही मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना प्रवेश देण्यात आला असून या प्रमुख मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. यादरम्यान हुल्लडबाजांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाईल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा तसेच आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा,असे आवाहन वाहतूक उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT