Mumbai Crime: नवरा-बायकोच्या भांडणानंतर घरात भयानक थरार, मुंबई हादरली

Mumbai Police: मुंबईमध्ये नवऱ्याने बायकोची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केली. अग्रिपाड्यामध्ये ही भयंकर घटना घडली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
Mumbai Crime: नवरा-बायकोच्या भांडणानंतर घरात भयानक थरार, मुंबई हादरली
Mumbai CrimeSaam Tv
Published On
  • मुंबईच्या अग्रिपाड्यात नवऱ्याने बायकोची हत्या केली

  • बायकोची हत्या केल्यानंतर १९ वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं

  • नवरा बायकोच्या कौटुंबिक वादातून मुंबईत भयंकर हत्याकांड

  • अग्रिपाडा हत्याकांड प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू

संजय गडदे, मुंबई

मुंबईत हत्याकांडाची भयंकर घटना घडली. एका तरुणाने बायकोची हत्या करुन आत्महत्या केली. मुंबईच्या अग्रिपाडा परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे मुंबई हादरली आहे. बायकोची हत्या करून तरुणाने आयुष्य का संपवले या मागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय तरुणाने बायकोची गळा चिरून हत्या केली त्यानंतर त्याने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तरुणाने बायकोची हत्या केल्यानंतर स्वत:च्या गळ्यावर चाकू फिरवला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Mumbai Crime: नवरा-बायकोच्या भांडणानंतर घरात भयानक थरार, मुंबई हादरली
Crime : प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या समर्थकाला संपवलं, घराजवळच भयंकर हल्ला; शहरात प्रचंड खळबळ

मोहम्मद एहसान शेख असं तरुणाचे नाव होते. तर जन्नत एहसान शेख असं त्याच्या बायकोचे नाव होते. दोघेही रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. तर तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद पोलिसांनी करून घेतली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. कौटुंबीक वादातून ही हत्याकांडाची घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Mumbai Crime: नवरा-बायकोच्या भांडणानंतर घरात भयानक थरार, मुंबई हादरली
Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

पोलिसांनी सांगितले की, कालापानी चौकीजवळ ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार घरगुती वादातून हल्ला झाला. अग्रिपाडा पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्याकांडामागचं खरं कारण पोलिस शोधत आहेत.

Mumbai Crime: नवरा-बायकोच्या भांडणानंतर घरात भयानक थरार, मुंबई हादरली
Crime: कॉलेजला गेली पण परत घरी आलीच नाही, तरुणीसोबत जे घडलं ते ऐकून कुटुंबीय हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com