Mumbai Electric Boat  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Electric Boat : मोठी बातमी! मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक बोट सेवा, तिकीट दर किती असणार? जाणून घ्या

Mumbai electric boat service : मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक बोट सेवा सुरु होईल. या बोटीच्या सेवेचे किती दर असतील, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Vishal Gangurde

मुंबईत डिसेंबरपासून आशियातील पहिली इलेक्ट्रिक प्रवासी बोट सेवा सुरु होणार

गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा व अलिबाग या मार्गांवर ही सेवा उपलब्ध

एक बोट ही ३० प्रवाशांची क्षमता असलेली आहे

ही बोट सेवा पर्यावरणपूरक, स्वस्त आणि जलद प्रवासाचा पर्याय ठरणार

गणेश कवडे, साम टीव्ही

मुंबई : इलेक्ट्रिक बोटीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबईत लवकरच इलेक्ट्रिक बोटीची आशियातील पहिली प्रवासी वाहतूक सेवा सुरु होणार आहे. मस्त्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मोठी घोषणा केली आहे.

महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि कँडेला कंपनीच्या माध्यमातून सेवा चालणार आहे. गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबागपर्यंत बोट सेवा चालणार आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून डिसेंबरमध्ये ही प्रवासी वाहतूक सेवा सुरु होणार आहे.

एकावेळी ३० प्रवासी वाहून नेण्याची इलेक्ट्रिक बोटीची क्षमता आहे. मेरिटाइम बोर्डाकडून १५ इलेक्ट्रिक बोटींची ऑर्डर करण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतुकीच्या तिकिट दराबाबत लवकरच निर्णय होणार आहे.

नव्या इलेक्ट्रिक बोटीच्या सेवेमुळे पर्यटकांना आणि स्थानिकांना स्वस्त, शांत आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होईल. या बोटींद्वारे होणाऱ्या प्रवासामुळे कार्बन उत्सर्जन पूर्णपणे टाळता येईल. या सेवेचा वापर वाढल्याास ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल. एलिफंटा सारख्या स्थळावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक सुलभ सुविधा ठरणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल.

या इलेक्ट्रिक सेवेमुळे मुंबईतील वाहतुकी कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे शहरातील समुद्री वाहतुकीत क्रांती घडणार आहे. भविष्यात ही सेवा अन्य मार्गांवरही विस्तारू शकते. इलेक्ट्रिक बोट सेवेमुळे अलिबागमधील पर्यटनस्थळांपर्यंत समुद्रीमार्गे जलद आणि सुरक्षित प्रवासाची सोय होईल. या सेवेमुळे ट्रॅफिक जाम, प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT