Mumbai आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून रेड अलर्ट जारी. ठाणे, रायगड, रत्नागिरीसह ७ जिल्ह्यांना इशारा. शाळा बंद, लोकल सेवा विस्कळीत, मुख्यमंत्री घेणार आढावा. Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलली, मुंबईत पावसाचं रौद्ररूप, IMD कडून रेड अलर्ट, शाळाही बंद

MUMBAI RAIN RED ALERT: पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, बुधवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

  • मुंबई व कोकणात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट

  • शाळांना सुट्टी, लोकल सेवा विस्कळीत

  • ७ जिल्ह्यांना रेड, पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट

  • मुख्यमंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री पावसाचा आढावा घेणार

IMD weather forecast Maharashtra : मुंबई आणि उपनगरात मागील ४८ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलल्यामुळे मुंबईमध्ये पुढील ४८ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून राज्यात पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, साताऱ्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. (Mumbai heavy rain red alert schools closed update)

मुंबईमध्ये मागील २४ तास अतिमुसळधार पाऊस कोसळला आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. त्याशिवाय लोकलसेवाही विस्कळीत झाली आहे. दादर, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, ठाण्यासह मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पावसाने रौद्ररूप घेतले आहे. पावसाचा वाढता जोर पाहता मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुढील ४८ तास मुंबईसह कोकणात धुंवाधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईकरांना झोडपले. मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत. सकाळच्या सत्रात आलेल्या विद्यार्थ्यांना ही सुखरूप घरी सोडण्याचे ही आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस घेणार आढावा -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पावसाचा आढावा घेणार आहे. सर्व जिल्ह्यातील आयुक्तांशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत. व्हिसीद्वारे फडणवीसांची आयुक्तांसोबत बैठक हणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशिवाय आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आढावा घेणार आहेत. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात जात आढावा घेणार आहेत.

मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, रात्री वादळी वा-यासह अति जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी ३ ते ४ मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस, पुणे वेधशाळेचा अंदाज

मुंबई पुणे सह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळ राज्यात मुसळधार पाऊस होईल आणि त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा सुद्धा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला. मुंबईत आज आणि उद्या अतीमुसळधार पावसाची शक्यता असून बुधवार पासून पावसाचा जोर कमी होईल असा पूर्वानुमान हवामान शास्त्रज्ञ यांनी व्यक्त केला आहे. मुंबई, कोकणला रेड अलर्ट असून पुण्यातील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हवामान खात्याकडून अपडेट अलर्ट जारी Maharashtra rainfall district-wise IMD warning

रेड अलर्ट: ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा

ऑरेंज अलर्ट: पालघर, सिंधुदुर्ग, संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, आमरावती

येलो: धुळे, नंदुरबार, नाशिक,आहिल्यानगर, पुणे, सोलापूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

SCROLL FOR NEXT