मुंबईत बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीने उत्कर्ष पॅनल उभे केले आहे.
भाजपकडून सहकार समृद्धी पॅनल रिंगणात उतरले आहे.
बीएमसी निवडणुकीपूर्वी ही निवडणूक ठाकरे वि भाजप या लढतीची चाचणी मानली जात आहे.
BEST cooperative election News Update : बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान पार पडत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना (Uddhav Thackeray) आणि मनसे यांनी एकत्रितरित्या उत्कर्ष पॅनल उभं केलं आहे, तर महायुतीकडून सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात उतरवण्यात (Utkarsh panel vs Sahakar Samruddhi panel BEST election) आलंय. यामध्ये प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणेंची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदेंच्या सेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांचा समावेश आहे. आज मतदानानंतर उद्या (मंगळवार) मतमोजणी होणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट म्हणून ही निवडणूक पाहिली जात आहे. (Uddhav Thackeray MNS alliance vs BJP in BEST polls)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.