Police file case in teen abuse over loan issue AI Image
मुंबई/पुणे

Mumbai: कर्ज न फेडण्याची भयंकर शिक्षा, २ तरुणांना मुखमैथुन करायला लावलं; मुंबईतून पुण्यात नेत अत्याचार

Mumbai Latest Crime news: कर्जाच्या वादातून मुंबईत अल्पवयीन व १९ वर्षीय तरुणावर अमानुष लैंगिक अत्याचार. पोलिसांनी प्रमुख आरोपीला अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

Bhagyashree Kamble

माणुसकीला काळिमा फासणारी घटना मुंबईतून समोर येत आहे. कर्जाची रक्कम वेळेत पूर्ण करू न शकल्यामुळे मारहाणीसह त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. त्यांना मारहाण करत ओरल सेक्स करण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडित तरूणांनी केला आहे. यापैकी एक तरूण अल्पवयीन असून, दुसरा तरूण १९ वर्षांचा असल्याची माहिती आहे. अल्पवयीन मुलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही संतापजनक घटना दक्षिण मुंबईतील एलटी मार्ग पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. अल्पवयीन मुलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, दिलीप गोस्वामी या मुख्य आरोपीने ४ जुलै रोजी पीडित तरूणांनासोबत येण्यास सांगितले. आरोपींनी मिळून दोन्ही तरूणांचे अपहरण केले आणि पुण्यातील भुलेश्वर येथील ऑफिसमध्ये घेऊन गेले.

यानंतर दिलीपचे इतर तीन साथीदार धीरज, पंचूबाई आणि भरत यांनी दोघांना मारहाण केली. तसेच बेल्टने मारहाण केली. त्यानंतर चारही आरोपींनी मिळून दोघांना ओरल सेक्स करण्यास भाग पाडले. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ देखील शूट केला, असं पीडित व्यक्तींनी सांगितलं. त्यानंतर आरोपींनी त्यांना पैसे परत करण्याच्या अटीवर सोडून दिले.

यानंतर पीडित तरूणांनी यासंदर्भात आपल्या पालकांना याची माहिती दिली. अल्पवयीन मुलाच्या आईने थेट एलटी मार्ग पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपासाला सुरूवात केली. तसेच तपास करून पोलिसांनी या घटनेच्या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याचे तीन आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती आहे. सध्या पीडित तरूणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Maharashtra Politics: ठाण्यापाठोपाठ कोकणातही महायुतीत वाद? वर्चस्वाचं राजकारण, भगव्या शालीचं कारण?

Maharashtra Rain: राज्यात पुढचे ४ दिवस कोसळधार, कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट? वाचा हवामान खात्याचा अंदाज

OTT Releases: 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' ते 'द ट्रायल २'; या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार हे धमाकेदार चित्रपट आणि सीरिज

Dhananjay Munde: राजकीय कमबॅक की समाजाला न्याय? बंजारा आरक्षणावर धनंजय मुंडेंचं राजकारण?

SCROLL FOR NEXT