Building Collapse: ४ मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, १२ जण ढिगाऱ्याखाली अडकले; भयंकर प्रसंग कॅमेऱ्यात कैद

Delhi building Collapse: वेलकम परिसरातील जनता मजदूर कॉलनीत चार मजली इमारत कोसळली. १२ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, ५ जणांची सुटका झाली.
FOUR-STOREY BUILDING COLLAPSES IN DELHI’S WELCOME AREA
FOUR-STOREY BUILDING COLLAPSES IN DELHI’S WELCOME AREASaam Tv News
Published On

दिल्लीत मोठी दुर्घटना घडली आहे. शनिवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, वेलकम परिसरात जनता मजदूर कॉलनीत ४ मजली इमारत कोसळली. आतापर्यंत सुमारे १२ जण ढिगाऱ्यात अडकल्याची माहिती आहे. अपघातावेळी इमारतीत अनेक लोक उपस्थित होते. घटना घडल्यानंतर बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, स्थानिक प्रशासनासह ७ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उपस्थित झाल्या आहेत. आतापर्यंत सुमारे ५ जणांना ढिगाऱ्यााखालून बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने रूग्णवाहिकेतून रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य अजूनही सुरू आहे.

ज्या भागात ही दुर्घटना घडली. त्या भागातील रस्ते खूपच अरूंद आहेत. अशा परिस्थित पथकाला बचावकार्य करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथकाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच इतर रहिवाशांना देखील ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात येईल. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

FOUR-STOREY BUILDING COLLAPSES IN DELHI’S WELCOME AREA
Politics: दोन्ही 'संजय'मुळे एकनाथ शिंदे सापडले चक्रव्यूहात, कडक शब्दात टोचले कान; नेमकं काय म्हणाले?

दिल्लीत भूकंपाचे हादरे बसले

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्ली एनसीआर, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशसह अनेक भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. हरियाणातील रोहतक येथे ४.१ रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदवली गेल्याची माहिती आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घराबाहेर आणि कार्यालयांबाहेर पडले होते. याभूकंपादरम्यानचे व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला होता.

FOUR-STOREY BUILDING COLLAPSES IN DELHI’S WELCOME AREA
'मला CM करा, आमचा गट भाजपात विलिन करतो..' एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? ठाकरे गटाच्या खासदारानं सांगितलं कारण..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com