Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: सांगा जगायचं कसं... गुरुपोर्णिमेच्या दिवशीच मुंबईत हजारो शिक्षकांचं आंदोलन

Mumbai Teacher Strike: मुंबईत आझाद मैदानावर आज शिक्षकांचं आंदोलन सुरु आहे. शिक्षकांना अजूनही पूर्ण पगाराची प्रतिक्षा आहे. त्यामुळे हे आंदोलन केले जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईत हजारो शिक्षकांचे आंदोलन

27 वर्षांपासून अंशत: अनुदानावर शाळांमध्ये अध्यापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकांना अजूनही पूर्ण पगार मिळत नाहीय. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकांना अजूनही पूर्ण पगाराची प्रतीक्षाच आहे. या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेला शिक्षकांनी 8 जुलैपासून शाळा बंद ठेवून आझाद मैदानावर आंदोलानाचा पवित्रा घेतलाय. त्यामुळे गावखेड्यातील गुरुजी गुरुपौर्णिमेलाच म्हणतायत, सांगा कसं जगायचं? नेमकं विषय काय आहे ? पाहूयात..

2014 मध्ये टप्पा अनुदानाच्या नैसर्गिक वाढीचा शासन निर्णय निघाला

4 ते 5 वर्षांत 100 टक्के अनुदान होऊन शिक्षकांना पूर्ण पगार मिळण्याची अपेक्षा

तरीही राज्यातील 771 शाळा, 383 तुकड्या 20 टक्के अनुदानावर

2009 शाळा आणि 4011 तुकड्या 60 टक्के अनुदानावर

2024-25 शैक्षणिक वर्षात टप्पा अनुदान मिळालेले नाही

20 टक्के टप्पा अनुदानासाठी दरवर्षी 1160 कोटी रुपयांची आवश्यकता

1998_99 पासून अंशत: अनुदानावर नोकरी करणारे शिक्षक पूर्ण पगारापासून वंचित

20 टक्के टप्पा अनुदानासाठी दरवर्षी 1160 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, शासनाने मान्य करूनही ते अनुदान का दिले जात नाही, असा प्रश्न आंदोलक शिक्षकांकडून विचारला जातोय. त्यामुळेच ज्ञानदान करणाऱ्यांवर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका अशी भूमिका शरद पवारांनी मांडलीय. तर उद्धव ठाकरेंनीही शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय....

विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची घोषणा झालेली असताना अद्याप अंमलबजावणी का नाही? असा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केलाय. आता शासन काय तोडगा काढणार? हजारो शिक्षक सेवानिवृत्तीच्या उबंरठ्यावरील शिक्षकांना निवृत्तीआधीतरी पूर्ण पगार मिळणार का? याकडे शिक्षकाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीजग्रस्त चिमुरड्यांसाठी मॅटेलकडून अनोखी 'बार्बी डॉल' लॉन्च

Narendra Jadhav : उद्धव ठाकरे CM असताना त्रिभाषा सूत्र अहवाल स्वीकारला होता? समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Politics : विधानभवनात गद्दारीवरून राडा! 'तू बूट चाटत होतास', शिंदेंच्या मंत्र्यांची जीभ घसरली

Maharashtra Politics : अधिवेशन मुंबईत,एकनाथ शिंदे दिल्लीत; महायुती सरकारमध्ये गँगवॉर?

पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर? पृथ्वीचा अंत जवळ येतोय? स्टीफन हॉकिंग यांची भयावह भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT