Mumbai Crime : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट; ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास, पोलिसांकडून दोघांना अटक

Mumbai Crime News : मुंबईत रिक्षा चोरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील ७ ऑटोरिक्षा रस्त्यावरून लंपास झाल्या. यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
mumbai News
mumbai Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Crime : मुंबईच्या कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या ऑटोरिक्षांच्या मालिकेचा अखेर पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून दोघा चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांनी एकूण ७ चोरीच्या ऑटोरिक्षा हस्तगत केल्या आहेत. आरोपींनी अशा प्रकारचे अनेक गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे .मोहम्मद मुस्लीम ताहीर अन्सारी (४०) व निसार इदु अहमद (५३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते सध्या दोघेही कुरार पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहे.

अशोक यादव (वय ४५) यांनी दि. १४ जून रोजी रात्री ११.१५ वाजता त्यांची रिक्षा रस्त्यावर पार्क केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी ती चोरीस गेली. फिर्यादीच्या तक्रारीवरून कलम ३०३(२) भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करत तांत्रिक विश्लेषण केले.

mumbai News
Shahapur News : टॉयलेटमध्ये रक्त आढळलं, विद्यार्थिनींची विवस्त्र करून तपासणी केली; शहापूरच्या इंग्लिश मीडियम शाळेतील प्रकार

तपासात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मालाड (पूर्व) येथे सापळा रचून मोहम्मद मुस्लीम ताहीर अन्सारी (४०) व निसार इदु अहमद (५३) या दोन आरोपींना अटक केली.आरोपींकडून एकूण ७ चोरीच्या ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या असून, या आरोपींविरोधात आधीही विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

mumbai News
Amit Shah : राजकीय निवृत्तीनंतर काय करणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितला प्लान

ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त महेश चिमटे, सह पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजीव तावडे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणली. या यशस्वी तपासाबद्दल कुरार पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

mumbai News
Eknath Shinde : 'रागाच्या भरात मारहाण केली, पण...'; संजय गायकवाड राड्यावर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com