Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Shock: प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव अन्...; मुंबईतल्या BDD चाळ परिसरात अज्ञात महिलेचा मृतदेह; शिवडीत खळबळ

Mumbai shivdi crime news: ३५ वर्षीय गरीना अब्दुल मजीद सय्यद या महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला असून, तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आलं आहे.

Bhagyashree Kamble

मुंबईच्या शिवडीतून अतिशय संतापजनक बातमी समोर येत आहे. एका ३५ वर्षीय महिलेची निघृण हत्या करण्यात आली आहे. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव झाले असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना मुंबईच्या शिवडी बीडीडी चाळ परिसरात घडली. गरीना अब्दुल मजीद सय्यद (वय वर्ष ३५) असे मृत महिलेचं नाव आहे. या महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव होत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असावा आणि मग हत्या करण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात आर. ए. किडवाई मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 103 (1), बीएनएस 2023 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. पोलिस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि आरोपीचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे. ती महिला नक्की कोण? तिची निघृण हत्या का करण्यात आली? याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT