Eknath Khadse Saam TV
मुंबई/पुणे

एकनाथ एकनाथ खडसेंच्या जावयाला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेचे जावई गिरीश चौधरीना मुंबई सत्र न्यायालयने दिलासा दिला आहे.

सुरज सावंत

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंचे (Eknath Khadse) जावई गिरीश चौधरींना मुंबई सत्र न्यायालयने दिलासा दिला आहे. पुणे भोसरी येथील MIDC जमिन घोटाळाप्रकरणी चौधरी हे मागील अनेक दिवसांपासून तुरूंगात होते. गिरीश चौधरी यांना पाठीच्या मणक्याचा आजार बळावल्याने उपचारासाठी चौधरींचे वकील मोहन टेकावडेंनी मुंबई सत्र न्यायालयात परवानगी मागितली होती.

वकीलांच्या मागणीनुसार न्यायालयाने गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना परळच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी परवानगी दिली आहे. शिवाय उपचारा दरम्यान गिरीश चौधरी यांना त्यांच्या पत्नी शारदा चौधरी यांना रुग्णालय प्रशासनाच्या वेळेनुसार भेटण्याची परवानगी न्यायालयाने (Mumbai Sessions Court) दिली आहे.

त्याचबरोबर चौधरी यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराचा अहवालही न्यायालयात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून या वैदयकीय उपचाराकरता देण्यात आलेल्या परवानगीचा गैरवापर न करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावनी २१ जून रोजी ठेवण्यात आलेली आहे.

काय आहे प्रकरण ?

एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत भोसरी येथे जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये (NCP) आल्यानंतर खडसेंना ईडीच्या कारवाई झाली होती. भाजप-शिवसेनेच्या सत्तेत महसूलमंत्री पदी असताना भोसरी एमआयडीसीत खरेदी केलेल्या जमीनीचा व्यवहार यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आलं होतं.

हे देखील पाहा -

खडसेंनी पत्नी मंदाकिनी यांच्या नावाने ३ कोटी ७५ लाखांना ३ एकर जमिनीचा व्यवहार केला होता. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करण्यासाठी १ कोटी ३७ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी ही भरण्यात आली होती. कोलकाता येथील उकानी आणि मंदाकिनी खडसे यांच्यात हा व्यवहार झाल्याचं दाखविण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. २०१४ मध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आणि खडसेंकडे महसूल खातं आलं एप्रिल २०१६ मध्ये खडसेंचा भोसरी MIDC मध्ये पत्नीच्या नावे जमीन व्यवहार झाला. पण त्याआधी इथे अनेक कंपन्याचं काम सुरु होतं. मग हा व्यवहार कसा काय झाला ? असा प्रश्न तक्रारदाराने उपस्थित केला होता आणि तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे अडचणीत आले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT