Ganesh Visarjan Mumbai Traffic
Ganesh Visarjan Mumbai Traffic  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Ganesh Visarjan 2023: मुंबईत गणेश विसर्जनाच्या दिवशी कोणते रस्ते बंद, कोणते सुरु? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Vishal Gangurde

सचिन गाड

Ganesh Visarjan Mumbai Traffic News:

मुंबईत गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहे. मुंबईत वाहतूक आणि गणपती मिरवणुका सुरळीत ठेवण्यासाठी मुंबईत अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. तर विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील काही रस्ते बंद करण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

मुंबईत यंदा १३ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर ७० हजारांहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आले आहेत.

तर गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गिरगाव, मालाड, मालवणी टी जंक्शन, दादर, जुहू आणि गणेशघाट पवई या ठिकाणी विसर्जन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. (ganesh visarjan Mumbai traffic)

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच काही अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना आदेशात वगळण्यात आलं आहे. या वाहनामंध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड,बेकरी पदार्थ, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीनचे टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय - निमसाकीय वाहने, शाळेच्या बसला प्रवेश असणार आहे. (Ganesh Visarjan Route Mumbai)

तत्पूर्वी, मुंबईत गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. संपूर्ण शहरात २० हजार पोलीस तैनात असणार आहेत. तर शहराचे ७००० सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मॉनिटरिंग केले जाणार आहे. त्यासोबत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही विशेष नियोजन केलं आहे.

कोणते रस्ते बंद असतील?

चिंचपोकळी जंक्शन ते गॅस कंपनी, भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन, केईएम रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाळकेश्वर रस्ता, पंडिता रमाबाई मार्ग, जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, एम.एस.अली मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, ताडदेव मार्ग, जहांगीर बोमण बेहराम मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, बी. जे मार्ग, मिर्झा गालीब मार्ग, मौलाना आझाद रोड, बेलासिस रोड, केळूस्कर रोड दक्षिण मार्ग, टिळक उड्डाण पूल

राजाराम मोहन रॉय मार्ग, कावसजी पटेल टँक रोड, संत सेना मार्ग, नानुभाऊ देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, दादासाहेब भडकमकर मार्ग, ६० फिट रोड, माहिम सायन लिंक रोड, टी. एच. कटारिया मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प रोड, एल. बी. एस. रस्ता, न्यु मिल रोड, संत रोहिदास मार्ग, नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, सीएसएमटी जंक्शन ते मेट्रो जंक्शन, जे. एस. एस. रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग,मौलाना शौकत अली रोड, डॉ. बी. ए. रोड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hit and Run Case | अल्पवयीने मुलाने दोघांना चिरडले! वडिलांवर होणार गुन्हा दाखल

Vidula Chougule : तुला पाहून सूर्यफूलही लाजून कोमेजलं...

Hingoli Water Crisis | Saam Tv च्या बातमीमुळे काय झालं बघाच!

Sanjay Raut | "त्यांनाच शिंदे नको होते.." राऊतांनी नावं घेत सगळंच सांगितलं..

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर तुफान पाऊस; निवळी घाटात साचलं पाणी, वाहतुकीला अडथळा

SCROLL FOR NEXT