Lalbaugcha Raja 2023: मुंबईत गणेशोत्सवाची धूम; लालबाग राजाच्या चरणी भाविकांची प्रचंड गर्दी

Lalbaugcha Raja 2023: मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनंत चतुर्दशीच्या आदल्यादिवशीही भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे.
Lalbaugcha Raja 2023/file Photos
Lalbaugcha Raja 2023/file Photos Saam tv
Published On

Lalbaugcha Raja Latest Update:

राज्यात सध्या गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. अशातच गेल्या काही काही दिवसांपासून नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनंत चतुर्दशीच्या आदल्यादिवशीही भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचे अनेक व्हिडिओ आतापर्यंत समोर आले आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्येही हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. (Latest Marathi News)

दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश चतुर्थीपासूनच अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे. या मंडळातील गणरायाचं दर्शनासाठी आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे.

मंडपात आलेल्या भाविकांची गर्दी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नियंत्रित करणे कठीण जात असल्याचे दिसून येत आहे. या गर्दीत महिला, जेष्ठ आणि लहान मुलांचेही हाल झाल्याचे समोर आले आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आतापर्यंत लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. शाहरुख खान, सोनू सूदपासून अनेक दिग्गज बॉलिवूड कलाकारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. भाविकांनी राजाला रोख पैशांसहित सोन्या-चांदीच्या दागिन्यांचेही भरभरून दान दिलं आहे.

Lalbaugcha Raja 2023/file Photos
Ganpati Visarjan 2023: पुण्यातील १८ विसर्जन घाट सज्ज; कोणत्या घाटावर कोणत्या मानाचा गणपती बाप्पा घेणार निरोप

दरम्यान, आज लालबागच्या राजाचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दर्शन घेतलं. अजित पवार यांच्यासोबत आज पार्थ पवार आणि सुनील तटकरे देखील होते.

Lalbaugcha Raja 2023/file Photos
Mahesh tapase: 'पंकजा मुंडे यांच्यासोबत भाजपकडून दुजाभाव, पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचं स्वागत करू'; राष्ट्रवादीच्या नेत्याकडून ऑफर?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com