Ganpati Visarjan 2023: पुण्यातील १८ विसर्जन घाट सज्ज; कोणत्या घाटावर कोणत्या मानाचा गणपती बाप्पा घेणार निरोप

Anant Chaturdashi 2023: आपले लाडके गणपती बाप्पा २८ सप्टेंबर रोजी निरोप घेणार आहेत.
Ganpati Visarjan
Ganpati Visarjansaam Tv
Published On

(सचिन जाधव)

Ganesh Visarjan Pune 2023:

आपले लाडके गणपती बाप्पा २८ सप्टेंबर रोजी निरोप घेणार आहेत. गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यासाठी मानाच्या गणेश मंडळांसह मध्यवस्तीतील सर्वच मंडळांची विसर्जन मिरवणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. पुणे शहर गणपती विसर्जनासाठी सज्ज झाले आहे. पुणे शहरातील सर्व विसर्जन घाटावर महापालिकेकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. पुणे महानगरपालिकेकडून शहरभरात एकूण १८ विसर्जन घाट बनवण्यात आले आहेत.(Latest News)

Ganpati Visarjan
Ganpati Visarjan 2023 Pune: ढोल ताशांचा गजर, आकर्षक देखावे अन् जल्लोष.. अशी असेल पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक

मोठ्या आनंद उत्साहात गणरायाचं आगमन झालं होतं. गणराया आपले दु:ख घेऊन उद्या निरोप घेणार आहेत. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज झाली आहे. महापालिकेनं विसर्जन घाटांवरील कर्मचारी व्यवस्थापन, जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणेची कामे पूर्ण झाली आहेत. विसर्जनासाठी अस्तित्वातील हौदांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली असून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. यासाठी पुणे या घाटांवर मानाच्या गणपतीसह इतर गणपतीचं विसर्जन होणार आहे. उद्या पुण्यात एकूण २ हजारपेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे.

बाप्पाला निरोप देण्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. पुण्यात गणेश भक्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होत असतात. मिरवणूक रस्ता आणि घाटांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं सर्व तयारी केलीय. तसेच विसर्जनासाठीची नियमावली प्रसिद्ध केलीय. दरम्यान पुणे महानगरपालिकेकडून विसर्जन घाट सज्ज करण्यात आलेत. मानाचा गणपतीचे विसर्जन होणाऱ्या विसर्जन घाटावर देखील तयारी पूर्ण करण्यात आलीय.

विसर्जन घाटांवर अग्निशमन दल आणि जीवरक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक, मुकादम, विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना स्वतंत्रपणे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील प्रकाश व्यवस्थेची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. गणेश मूर्ती संकलन आणि दान केंद्रांची व्यवस्थाही क्षेत्रीय कार्यालयनिहाय करण्यात आली आहे.

नदी आणि नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी धोका नियंत्रक कठडे उभारण्यात आले आहेत. याचबरोबर अग्निशमन दलाकडून १८ विसर्जन घाटांवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जवानांची नियुक्ती करण्यात आलीय. तसेच १३० खासगी जीवरक्षकही तैनात करण्यात आलेत. रात्रपाळीत काम करणाऱ्या जीवरक्षकांना फ्लोरोसेन्ट जॅकेट्स देण्यात आलेत. नदी किनारी सुरक्षेच्या दृष्टीने दोरखंड लावण्यात आलेत.

कोणते आहेत विसर्जन घाट

संगम घाट, वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाट, अष्टभुजा मंदिर, बापू घाट, विठ्ठल मंदिर, ठोसरपागा, राजाराम पूल, नेने घाट, ओंकारेश्वर घाट, पुलाची वाडी, खंडोजी बाबा चौक, गरवारे महाविद्यालयामागील बाजू, दत्तवाडी घाट, औंधगाव घाट.

कधी निघेल विसर्जन मिरणूक

  • मानाचा पहिला कसबा गणपतीची मिरवणूक सकाळी ८.३० वाजता सुरू होईल.

  • मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक सकाळी ९ वाजता निघेल.

  • मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणेश मंडळाची मिरवणूक सकाळी १० वाजता निघेल.

  • मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची मिरवणूक सकाळी ९.४५ वाजता निघेल.

  • मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीची मिरवणूक सकाळी ९.४५ वाजता निघेल.

कुठे होणार मानाच्या गणपतींचे विसर्जन

पतंगा विसर्जन घाट

  1. मानाचा पहिला कसबा गणपती

  2. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्‍वरी गणपती

  3. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती

पांचाळेश्‍वर मंदिर घाट

  1. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती

  2. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती

  3. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

  4. शारदा गजानन,मंडई या गणपतीच होणार विसर्जन.

Ganpati Visarjan
Girgaon Chowpaty ready for Anant Chaturdashi | गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com