Mumbai Malad Crime News AI
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत भरस्त्यात टॅक्सी चालकाकडून तरुणाची हत्या, नेमकं काय घडलं?

Mumbai Malad Crime News : मुंबईच्या मालाड परिसरात भर रस्त्यात टॅक्सी चालकाने तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्याची हत्या केली आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Alisha Khedekar

  • मालाडमध्ये रोड रेजमधून तरुणाची हत्या

  • टॅक्सी चालकाने धारदार शस्त्राने हल्ला केला

  • शारिक अन्सारी (२५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू

  • बांगुर नगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले

Mumbai Malad Link Road Murder News मुंबईतील मालाडमध्ये भर रस्त्यात एका बाइकस्वाराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टॅक्सी चालकासोबत झालेल्या क्षुल्लक वादातून भर रस्त्यात राडा झाला. संतापलेल्या टॅक्सी चालकाने धारदार शस्त्राने बाईकस्वार तरुणाची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित टॅक्सी चालकाला आणि त्याच्या टॅक्सीमध्ये बसलेल्या प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव शारिक अन्सारी (२५) असे असून तो एका डिजिटल मार्केटिंग कंपनीत काम करत होता. काल म्हणजेच १४ मार्च रोजी शनिवारी मालाडमधील इनॉर्बिट मॉलजवळील लिंक रोडवरून अंधेरीला जाताना अन्सारीचा मागून येणाऱ्या कॅब चालकाशी वाद झाला.

हा वाद इतका वाढला की, टॅक्सी चालकाने टॅक्सीमधून उतरून शारिक अन्सारीवर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आणि जागीच कोसळला. अन्सारीला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच बांगुर नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात किराणा दुकानातून अवैध पेट्रोल विक्री, दुकानातून 25 लिटर पेट्रोल जप्त

Vidhan Parishad Election: महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच; विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून भाजपची कोंडी

भीमाशंकर कुणाचं? खेड की आंबेगावचं? राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच जुंपली

Winged Eyeliner लावताना वाटतो का त्रास? या ७ सोप्या टिप्स फॉलो करा; मिळेल परफेक्ट लूक

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT