Mumbai GBS Update  Saam Tv
मुंबई/पुणे

GBS in Mumbai : Alert ! जीबीएस मुंबईत घुसला, पहिला रुग्ण आढळल्यानं टेन्शन वाढलं; अशी घ्या काळजी

GB Syndrome Spreads to Mumbai: मुंबईतल्या अंधेरीमध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला आहे. जीबीएसने मुंबईत शिरकाव केल्यामुळे मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. आरोग्य प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे.

Priya More

पुणेकरांची चिंता वाढवलेल्या जीबी सिंड्रोमचा आता मुंबईमध्ये शिरकाव झाला आहे. जीबी सिंड्रोमचा मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये जीबी सिंड्रोम आजाराचा वेगाने प्रसार होत आहे. आतापर्यंत मुंबईत या आजाराचा एकही रुग्ण आढळला नव्हता. पण आता मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एका पुरुषाला दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच गुडलेन बॅरे सिंड्रोम जीबीएस आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात ही व्यक्ती राहते. या व्यक्तीवर सध्या महापालिकेच्या सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी ५० विशेष बेड राखीव ठेवण्याची सूचना केली. शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील मुरजी पटेल यांनी केल्या आहेत.

दरम्यान, पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात रुग्णांचा आकडा १७३ वर पोहचला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात १७० संशयीत जीबीएस बाधित रुग्णांपैकी १४० रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. २१ रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. या आजारामुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जीबीएस आजाराची लक्षणं -

- अचानक पायातील किंवा हातात येणारी कजोरी अथवा लकवा

- अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील भास किंवा कमजोरी

- डायरिया

नागरीकांनी कशी घ्यावी काळजी -

- पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

- पाणी उकळून पिणे.

- अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.

- वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.

- शिळे अन्न आणि अर्धवट शिजलेले अन्न (चिकन, मटण) खावू नये.

- नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात जावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT