Pune GBS : पुण्यात जीबीएस फोफावतोय, ४७ जण ICU मध्ये, रूग्णसंख्या १६३ वर

Guillain Barre Syndrome Pune : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात जीबीआस आजाराचा विळखा वाढत चालला आहे. पुण्यातील जीबीआस आजाराच्या रूग्णांची संख्या १६३ वर पोहचली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात रूगि्ण आढळत आहेत.
GB Syndrome
GB Syndrome Saam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune GB Syndrome News : पुण्यात जीबीएस आजाराचा विळखा वाढतच चाललाय, दिवसागणिक रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सोमवारी पुण्यात पाच संशयीत रूग्णाची भर पडली, त्यामुळे एकूण रूग्णसंख्या १६३ वर पोहचली आहे. यामधील ४७ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर इतरांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रूग्णांमधील ४७ जण आयसीयूमध्ये आहेत.

पुण्यात जी बी एस रुग्णाची संख्या १६३ वर पोहचली आहे. सोमवारी पुण्यात पाच नव्या रूग्णांची भर पडली आहे. पुण्यात आतापर्यत पाच जीबीएस रूग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. आयसीयूमध्ये असणाऱ्या ४७ रूग्णांपैकी २१ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून जीबीआस आजाराने पुण्यात थैमान घातलेय, त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन कऱण्यात आलेय.

GB Syndrome
Pune : पुण्यातील वाहतूक कोंडी मोडण्यासाठी चंद्रकांत पाटील मैदानात, मास्टार प्लान सांगितला

वाढत्या जीबीएस आजाराची कारणे काय? याबाबत आत्ता पशूसंवर्धन विभागाच्या वतीने फक्त पाणीच नव्हे तर विविध पक्षी, पोल्ट्रीफॉर्म आणि मातीचे सँपल घेऊन नेमकं हा आजार का वाढत आहे, याबाबत संशोधन करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य उपसंचालकांनी सोमवारी दिली आहे.पुणे महापालिका,राज्य शासन, तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध पथकांच्या माध्यमातून पाण्याचे नमुने देखील तपासण्यात आले आहे.

GB Syndrome
Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, गुरूवारी काही भागात पाणीबाणी

महापालिका भागातील ३२ रुग्ण, तर नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील ८६ रुग्ण, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील १८ रुग्ण, पुणे ग्रामीण भागातील १९ रुग्ण, इतर जिल्ह्यातील ८ असे एकूण १६३ रुग्ण आढळून आले आहे.तर १११ रुग्ण हे दवाखान्यात उपचार घेत आहे तर ४७ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांचा डिस्चार्ज झाला आहे.जे १११ रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहे त्यातील ४७ रुग्ण आयसीयूमध्ये असून यातील २१ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.

GB Syndrome
Mumbai Crime : मुंबई हादरली! एक्सप्रेस ट्रेनमध्ये ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com