
Pune water supply : गुरूवारी पुण्यातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशीरा अथवा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती व जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी दिली. त्यामुळे पुणेकरांनी गुरूवारी पाणी जपून वापरावे, असे आवाहनही करण्यात आलेय.
पुण्यात सहकारनगरमधील काही भागातील पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद राहणार आहे. पर्वती येथील टाक्यांमधून पाणीपुरवठा होणाऱ्या सहकारनगरमधील काही भागातील पाणीपुरवठा येत्या गुरुवारी ६ फेब्रुवारी रोजी बंद राहणार आहे.तर शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
मेघना सोसायटी, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर क्रमांक २ कमानीच्या आतील भाग, गोविंद गौरव सोसायटी, स्वानंद सोसायटी, नामदेव सोसायटी, संत ज्ञानेश्वर सोसायटी, लकाकि सोसायटी, अण्णा भाऊ साठे वसाहत, शाहू वसाहत, लक्ष्मीनगर मनपा शाळा १११ जवळील भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
खडकवासला धरणसाखळीत १९.४१ टीएमसी पाणीसाठा
पुण्यातील खडकवासला धरणसाखळीत १९.४१ टीएमसी म्हणजेचं एकूण ६६.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षापेक्षा दीड टीएमसी जादा पाणीसाठा, शेतीचे आवर्तन बंद असल्याने राजगड तालुक्यातील पानशेत, वरसगाव धरणांमधून विसर्ग बंद करण्यात आलाय.
पानशेत आणि वरसगाव या दोन्ही धरणांतील पाण्याची पातळी ७० टक्क्यांहून अधिक आहे.शेतकऱ्यांनी मागणी केल्याने कालवा सल्लागार समितीच्या मंजुरीनंतर उन्हाळी आवर्तनाचे पाणी सुरू करण्यात येणार आहे. पिण्यासाठी तसेच शेतीसाठी खडकवासलाच्या लाभ क्षेत्रातील शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यापर्यंतच्या ६६ हजार हेक्टर शेतीसह या भागातील लाखो रहिवासी पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला धरणसाखळीवर अवलंबून आहे. दौंड, हवेली, इंदापूर तालुक्यांतील ६६ हजार हेक्टर शेतीसह पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांची तहान खडकवासला धरणसाखळीवर अवलंबून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.