Pune GBS: चिंता वाढली! जीबी सिंड्रोमने घेतले ६ जणांचे बळी, रुग्णसंख्या १७३ वर; २१ जण व्हेंटीलेटरवर

Guillain-Barré Syndrome Pune: पुण्यामध्ये गेल्या २४ तासांत नव्याने जीबी सिंड्रोम आजाराची लागण झालेले तीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या १७३ वर पोहोचली आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Pune GBS: चिंता वाढली! जीबी सिंड्रोमने घेतले ६ जणांचे बळी, रुग्णसंख्या १७३ वर; २१ जण व्हेंटीलेटरवर
GB Syndrome Saam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये गुलेन बॅरे सिंड्रोम या आजाराने चिंता आणखी वाढली आहे. जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णांची पुण्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे पुण्यात या आजाराची लागण झालेल्या आणखी एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जीबी सिंड्रोम आजारामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सहावर पोहचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये गेल्या २४ तासांत नव्याने जीबी सिंड्रोम आजाराची लागण झालेले तीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या १७३ वर पोहोचली आहे. मागील तीन दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत असून, गुरूवारी १० रुग्ण बरे झाले. पुणे शहर आणि जिल्ह्यात १७० संशयीत जीबीएस बाधित रुग्णांपैकी १४० रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे.

जीबी सिंड्रोम बाधितांमध्ये ३४ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून, सर्वाधिक रुग्णसंख्या ८७ ही समाविष्ट गावातील आहे. २२ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, २२ रुग्ण पुणे ग्रामीण तर ८ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत. उपाचारासाठी दाखल रुग्णांपैकी ५५ रूग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत असून २१ रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.

पुण्यामध्ये गुरूवारी जीबीएसची लागण झालेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कर्वेनगरमधील वडारवस्ती येथील ६३ वर्षीय पुरुषाचा रुग्णालयात मृत्यू झाला. रुग्णाला ताप, जुलाब, चालण्यास त्रास आणि पायांमध्ये अशक्तपणा जाणवत होता. या व्यक्तीला २८ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल केलं होतं. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला.

पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णांची सध्य स्थिती -

वय – एकूण रुग्णसंख्या

० ते ९ वर्षे वयोगट – २३

१० ते १९ वर्षे वयोगट – २३

२० ते २९ वर्षे वयोगट – ३८

३० ते ३९ वर्षे वयोगट – २१

४० ते ४९ वर्षे वयोगट – २२

५० ते ५९ वर्षे वयोगट – २५

६० ते ६९ वर्षे वयोगट - १५

७० ते ७९ वर्षे वयोगट – २

८० ते ८९ वर्षे वयोगट – ४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com