Heavy Rainfall Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Rain : मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईवर दुहेरी संकट, पुढील ५ दिवस धोक्याचे

IMD Mumbai weather warning : मुंबईवर पावसाचं आणि समुद्राच्या उंच लाटांचं दुहेरी संकट कोसळलं आहे. पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस आणि साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार आहेत. मुंबईकरांनी समुद्रावर जाणं टाळण्याचे बीएमसीचे आवाहन आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Rain Alert : मुंबई आणि उपनगरावर पुढील पाच दिवस दुहेरी संकट ओढावलं आहे. मुसळधार पावसासोबतच समुद्र खवळणार आहे. समुद्रात उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्रात पुढील पाच दिवस साडेचार मीटर पेक्षा उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोठी भरती असणाऱ्या दिवशी भरती कालावधीच्या काळात समुद्रावर न जाण्याचे मुंबई महानगरपालिकेचे मुंबईकरांना आवाहन करण्यात आले आहे.

24 जून रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता चार पॉईंट 59 मीटर उंचीची लाट उसळणार

25 जून रोजी 12 .05 वाजता 4.71 मीटर उंचीची लाट उसळणार

26 जून रोजी 12.55 वाजता 4.75 मिटर उंचीची लाट उसळणार

27 जून रोजी 1.40 वाजता 4.73.मीटर उंचीच्या लाटा उसळणार

28 जून रोजी दुपारी 2.26 वाजता 4..64 मीटर उंचीच्या लाटा उसळणार

मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. रात्री सोसाट्याचा वारा आणि कोसळधारेने झोडपले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई विरारमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची लाईफलाईनही बाधित झाली. मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे. तर पनवेल सीएसएमटी हार्बर मार्गावरही पावसामुळे लोकल उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वेवर लोकल संथ गतीने सुरू आहेत. लोकल उशिराने असल्यामुळे कार्यलायला निघालेल्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ऑफिसला पोचहण्यासाठी चाकरमान्याची तारांबळ होत आहे. त्यात पुढचे चार तास धोक्याचे असून मुंबईकरांना घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT