मुलानं डोकं बसबाहेर काढलं, दुसऱ्या वाहनाने उडवलं, लेकाचं शीर हातात घेऊन बापाचा आक्रोश, काळीज पिळवटणारी घटना

Hathras Child Head Cut Off News : हाथरसमध्ये एक भीषण अपघातात ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. वऱ्हाडाच्या बसमधून बापाला बाय करण्यासाठी डोकं बाहेर काढलं अन् काळाने घाला घातला. बाप मुलाचे शीर हातात घेऊन भर रस्त्यावर धायमोकलून रडत होता.
Hathras Child Head Cut Off News
Hathras Child Head Cut Off News AI Image
Published On

Uttarpradesh Hathras Shocking News : प्रत्येकच्या काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली आहे. बापाला बाय करण्यासाठी ११ वर्षाच्या मुलाने बसमधून बाहेर डोकं काढलं. पण त्याचवेळी काळाने घाला घातला. वेगात आलेल्या दुसऱ्या वाहनाने मुलाचं डोक उडवलं. बापाला बाय करणाऱ्या मुलाचे शीर रस्त्यावर पडलं होतं अन् धड बसमध्ये तडफडत होतं. बापाच्या डोळ्यासमोरच मुलाचा भयंकर मृत्यू झाला. मुलाच्या रक्ताने बसची खिडकी आणि रस्ता लाल झाला होता. बाप हातात मुलाचे शीर घेऊन धायमोकलून रडत होता. ही घटना पाहून उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचे काळीज पिळवटून निघालं. हाथरसमधील या भयंकर अपघाताने प्रत्येकाचे काळीज चिरेल. अलिगढवरून हथरसला वऱ्हाडाची बस निघाला होती, त्यावेळी हा भयंकर अपघात झाला.

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात ११ वर्षाच्या मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नाला जाण्यासाठी ११ वर्षाचा मोहम्मद अली नातेवाईकांसोबत वऱ्हाडाच्या बसमध्ये बसला होता. लग्नासाठी दोन दिवसांपूर्वी नवीन कपडे खरेदी केले होते. पण त्याच्या नशीबात काही वेगळेच होते. धावत्या बसमधून बापाला (आस मोहम्मद) बाय करण्यासाठी त्यानं डोकं खिडकीच्या बाहेर काढलं अन् त्याचवेळी पिकअपने जोरात धडक दिली. शीर धडावेगळं होऊन रस्त्यावर पडलं अन् धड बसमध्ये तडफडत होतं. बापाच्या डोळ्यासमोर मुलाचे धड आणि शीर वेगळं झालं. ही घटना पाहून रस्त्यावरील अन् बसमधील सर्वांचं काळीज चिरलं.

Hathras Child Head Cut Off News
तुमचा मोबाइल नंबर किती जुना? ५ वर्ष एकच नंबर सांगतो तुझ्याबद्दल ५ गोष्टी

बसमधून ६५ जण लग्नाला निघाले होते. आनंदाचे वातावरण होतं. पण क्षणात या आनंदावर विरजन पडलं. ११ वर्षांच्या मोहम्मद अलीचं डोकं बाप आस मोहम्मदच्या हातत होतं. तर काका साबूउद्दीन अन् भाऊ त्याच्या धडाला पकडून रडत होते. बसच्या सीट रक्ताने लाल झाले होते. बसच्या खिडकीवर अन् रस्त्यावरही जिकडे तिकडे रक्त होते. आस मोहम्मद मुलाचे शीर घेऊन रस्त्यावर सैरभर किंकाळत धावत होता. काका आणि बाप आपल्या मुलाचे शीर अन् धड जोडायचा प्रयत्न करत होते. या घटनेमुळे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकजण सून्न झाला होता. काळीज चिरणाऱ्या या घटनेनंतर काही तास वाहतूक कोंडी झाली होती.

Hathras Child Head Cut Off News
Tushar Ghadigaonkar : मराठमोळ्या अभिनेत्याची आत्महत्या, अवघ्या ३२ व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

या काळीज चिरणाऱ्या अपघाताची माहिती स्थानिकांनी तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला अन् मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी तात्काळ वाहतूक कोंडी सोडवली. पोलिसांनी पिकअप चालकाविरोधात गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध घेतला आहे. अपघातानंतर पिकअप चालक फरार आहे.

Hathras Child Head Cut Off News
₹५०० काढले, ११०० रूपये निघाले, ATM मधून पैशांचा पाऊस, लोकांची तुफान गर्दी | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com