Virar News Saamtv
मुंबई/पुणे

Virar News: दुर्दैवी घटना! पोहण्याचा मोह जीवावर बेतला... अर्नाळा समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

Arnala Beach News: आचोळे येथे राहणारे तीन महाविद्यालयीन तरुण गुरुवारी दुपारी अर्नाळा समुद्र (Arnala Beach) किनाऱ्यावर फिरायला गेले होते.

चेतन इंगळे

Mumbai Rain News: मुंबईसह (Monsoon) राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून मुंबईकरांची चांगलीच तारांबळ होताना दिसत आहे. पावसाच्या वाढत्या जोरामुळे शहरात अनेक दुर्घटनाही समोर येत आहेत.

विरारमधून (Virar) अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली असून विरारच्या अर्नाळा समुद्रात पोहायला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमित गुप्ता (१७) असे या या मुलाचे नाव असून तो नावासोपारा येथे रहात होता. (Maharashtra Rain Update)

याबाबत अधिक माहिती अशी की, नालासोपारा (Nala Sopara) पूर्वेच्या आचोळे येथे राहणारे तीन महाविद्यालयीन तरुण गुरुवारी दुपारी अर्नाळा समुद्र (Arnala Beach) किनाऱ्यावर फिरायला गेले होते. ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. संध्याकाळी ६ च्या सुमारास अमित गुप्ता (१७) हा तरुण बुडायला लागला.

त्याच्या मित्रांनी त्वरित जवळच असलेल्या अर्नाळा सागरी पोलिसांना जाऊन माहिती दिली. पोलीस आणि तटरक्षक दलाने या मुलाला बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिली.

मित्रांसोबत पार्टीला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू...

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणाचा तलावातील पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास हिंगणा (Hingana) तालुक्यातील बोरगाव परिसरात घडली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

कितीही खासदार फोडा, उरावर भगवा फडकवणार, ओमराजेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडली

Spring Roll Recipe: घरच्या घरी बनवा टेस्टी स्प्रिंग रोल; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT