भडगाव (जळगाव) : गुढे (ता. भडगाव) येथील रहिवासी व भारतीय सैन्यदलात नायक पदावर कार्यरत असलेले (soldier) जवान राहुल श्रावण माळी यांचे भारत -बांगलादेश सीमेजवळ पश्र्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे मंगळवारी (२७ जून) देशसेवा बजावत असताना आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे (Bhadgaon) गावावर शोककळा पसरली असून, त्यांचे पार्थिव (Soldier Death) ताब्यात घेण्यासाठी कुटुंबीय कोलकता येथे रवाना झाले आहेत. त्यांच्यावर आज (३० जून) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. (Live Marathi News)
गुढे (ता. भडगाव) येथील जवान राहुल माळी (वय ३४) यांचे पश्चिम बंगालमधील कंचनपुरा येथे २७ जूनला कर्तव्य बजावत असताना आकस्मिक निधन झाले. त्यांचे पार्थिव ताब्यात घेण्यासाठी त्याचे मोठे भाऊ अविनाश माळी हे कोलकता येथे रवाना झाले असल्याचे कुटुंबाच्यावतीने सांगण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा संत सावता महाराज पंच कमिटीचे सदस्य श्रावण श्रीधर माळी यांचे सर्वात लहान वीर पुत्र राहुल माळी हे १४ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. पश्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे ते नायक पदावर सेवा बजावत होते. कुंटुबासह ते आर्मी सेंटरमध्ये वास्तव्यास होते.
बराकपूर येथील आर्मी हॉस्पिटल येथे बुधवारी (२८ जून) शवविच्छेदन करून त्यांचे पार्थिव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन लहान मुले शिव (वय ४ वर्ष) व शंभु (वय दीड वर्ष), वडील, आई व दोन मोठे भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे. प्राथमिक शिक्षक अविनाश माळी यांचे ते लहान बंधू आहेत. शुक्रवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात गुढे- जुवार्डी फाट्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, यासाठी ग्रामस्थ व मित्र परिवाराने तयारी सुरू केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.