Jalgaon Accident News: तपास पथकाच्‍या वाहनावर झाड कोसळून दोन पोलिस ठार; तिघे जखमी

तपास पथकाच्‍या वाहनावर झाड कोसळून दोन पोलिस ठार; तिघे जखमी
Jalgaon Accident News
Jalgaon Accident NewsSaam tv
Published On

एरंडोल (जळगाव) : जिल्‍हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाच्या वाहनावर भलेमोठे चिंचेचे जिर्ण झाड कोसळून दोन पोलिस (Police) कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. कासोदा- एरंडोल (Erandol) दरम्यान अंजनी प्रकल्पाच्या कालव्याजवळ पावणे नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. (Latest Marathi News)

Jalgaon Accident News
Ratnagiri- Kolhapur Highway Traffic Update : रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील रस्ता खचला, वाहतूक धिम्या गतीने सुरु

जळगाव जिल्‍हा आर्थिक गुन्हे शाखेचे तपासपथक शासकीय वाहनाने कासोद्याकडून एरंडोलकडे जात होते. गुरुवारी (२९ जून) पावणे नऊच्या दरम्यान भलेमोठे चिंचेचे झाड या पोलिस वाहनावर कोसळले. यात वाहनातील दोघे दाबले जाऊन (Accident) त्यांचा जागीच मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक दर्शन दातीर व पोलिस कर्मचारी अजय चौधरी यांचा अपघातात मृत्यू झाला. उर्वरीत तिघे जखमी झाले. अपघात घडला त्यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील हे त्यांच्या वाहनाने जवखेडा (ता. एरंडोल) येथे घरी जात होते. घटना पाहून त्यांनी तत्काळ एरंडोल पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिस निरीक्षक संतोष बारोडे, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. उपनगराध्यक्ष कुणाल महाजन व ग्रामस्थांनी जखमींना तातडीने बाहेर काढून खासगी वाहनाने (Jalgaon) जळगावला रवाना केले.

Jalgaon Accident News
Beed Crime News: अंबाजोगाईत भररस्त्यात तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; स्थानिकांनी धाव घेताच दुचाकीस्वारांनी ठोकली धूम

तिघांची प्रकृती धोक्याबाहेर

पोलिसांच्या वाहनातील सहाय्यक फौजदार भरत जेठवे, नीलेश सूर्यवंशी आणि चंद्रकांत शिंदे अशा तिघांना रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू करण्यात आले असून घटनेचे वृत्त कळताच वरीष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्‍हा रूग्णालयात धाव घेत चौकशी केली.

Jalgaon Accident News
Mumbai crime: आईच्‍या अंत्‍यविधीच्‍या नावाने मागत होता पैसे; मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप

क्रेन लावून काढले मृतदेह

पोलिस वाहनावर पडलेले चिंचेचे झाड प्रचंड वजनी आणि भले मोठे असल्याने त्यात पोलिस वाहनाचा पूर्णतः चुराडा झाला. दोन कर्मचारी दबले गेल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तातडीने क्रेन मागवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर मदतकार्य सुरु होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com