Beed Crime News: अंबाजोगाईत भररस्त्यात तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; स्थानिकांनी धाव घेताच दुचाकीस्वारांनी ठोकली धूम

Ambajogai Crime News: शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडच्या अंबाजोगाई शहरात भररस्त्यात एका तरुणीचा अपहरणाचा प्रयत्न झाला.
Beed Ambajogai Crime News
Beed Ambajogai Crime NewsSaam TV
Published On

Beed Ambajogai Crime News: पुणे शहरात तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असताना, बीडमधून (Beed News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहरात भररस्त्यात एका तरुणीचा अपहरणाचा प्रयत्न झाला.

दुचाकीवर आलेल्या दोघांनी तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी तरुणीला बळजबरीने गाडीवर बसवण्याचा प्रयत्न करत असताना सदरील तरुणी मोठ्याने ओरडल्याने परिसरात असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाजाकडे धाव घेतली.

Beed Ambajogai Crime News
Jalgaon Police News: पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळलं, आषाढी एकादशीच्या दिवशीच पोलीस अधिकाऱ्यासह चालकाचा दुर्देवी अंत

स्थानिक आपल्याकडे येत असल्याचे पाहून दुचाकीवर आलेल्या दोघांनीही तिथून धूम ठोकली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंबाजोगाई (Ambajogai News) हे शांतताप्रिय, सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून गुंडगिरी, दादागिरी, यामुळे शहराची शांतता भंग होणाऱ्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत.

शहरात रोडरोमियोंचा वाढता सुळसुळाट (Crime News) महिला व मुलींमधील असुरक्षितता वाढत आहे. अशीच घटना गुरूवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या दरम्यान घडली. शहरातील गजबजलेला परिसर असलेल्या चौसाळकर कॉलनी परिसरात दोन अनोळखी तरुण एका युवतीला बळजबरीने दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न करत होते.

Beed Ambajogai Crime News
Solapur Accident News: भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; पतीच्या डोळ्यासमोरच पत्नीचा मृत्यू, हृदयद्रावक घटना!

मुलगी स्वतः चा बचाव करण्यासाठी मोठ्याने ओरडली. यावेळी बाजूलाचं असलेल्या मंदिरात दर्शनासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि धाव घेतली. लोक येत असल्याची चाहूल लागताच त्या दोन तरुणांनी धूम ठोकली. दरम्यान सदरील तरुणीला सामाजिक कार्यकर्त्यांनी धीर दिला आणि तिच्या घरापर्यंत सोडले.

मात्र, यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं दिसून येत आहे. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या अंबाजोगाई शहरात गाव खेड्यासह बाहेरून मुली शिकायला येतात. मात्र, त्याच अंबाजोगाई शहरात अशा घटना होत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com