mumbai  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Rain Update : मुंबईत पुन्हा मुसळधार; भर दुपारीच काळोख, कुठे-कुठे पाऊस बरसला?

Mumbai Rain Update in marathi : मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस पडण्याआधी भर दुपारीच काळोख पसरल्याचं दिसून आलं.

Vishal Gangurde

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई शहरासह उपनगरातील विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कालपासून उघडीप घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या दादर, माहिम, कांदिवली परिसरात पाऊस कोसळत आहे. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. या वातावरणामुळे भर दुपारी काळोख पसरला होता. त्यानंतर सुरु झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

पावसामुळे शहरातील सखल पाणी साचलं आहे. काही तासांच्या पावसाने अंधेरीचा सबवे पाण्याखाली गेला आहे. या पावसामुळे कुर्ला स्टेशन येथील ब्रिजवरील सकल भागात पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळत आहे. वरळी भुयारी मेट्रो पाण्याखाली गेला आहे.

रिक्षावर कोसळलं झाड

मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील 20 मिनिटांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसात अंधेरी पूर्वेकडील पानिपत चौकात एक झाड रिक्षावर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. झाड रिक्षावर कोसळल्यामुळे रिक्षा चालक जखमी झाला आहे. त्याला महापालिकेच्या कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

झाड कोसळल्यामुळे अंधेरी सबवे परिसरातून जोगेश्वरी पूर्वेकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. झाड बाजूला घेण्याचे काम सुरू आहे.

वरळी मेट्रोत स्थानकात छत गळती

मेट्रो 3 च्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकानंतर वरळी मेट्रो स्थानकातही छत गळती सुरू झाली आहे. स्टेशनच्या तिकीट काउंटरजवळ ही गळती सुरु असून आहे. त्यामुळे पाणी बादलीत साठवले जात आहे. बादली भरल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून पाणी बाहेर फेकले जात आहे. या छत गळतीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहबे. आचार्य अत्रे मेट्रो स्थानकानंतर वरळी स्थानकावरही तातडीने लक्ष दयावे, अशी प्रवासी वर्गाची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

SCROLL FOR NEXT