Mumbai Pune Missing Link Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रवास फुकटात होणार; गेमचेंजर प्रकल्प कोणत्या महामार्गांना जोणार? महत्वाची अपटेड समोर

Mumbai Pune Missing Link Join Samruddhi Highway: मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंक सुरु करण्यात येणार आहे. यानंतर समृद्धी महामार्ग, कोकण कोस्टल रोड आणि वसई-विरार मल्टीमॉडेल कॉरिडोरची जोडण्याचा प्लान आहे.

Siddhi Hande

मिसिंग लिंक १ मेपासून होणार सुरु

भविष्यात महामार्ग समृद्धी, कोकण कोस्टल रोड आणि वसई-विरार मल्टीमॉडेलशी जोडणार

सर्व महामार्ग एकमेकांना जोडणार, कनेक्टिव्हिटी वाढणार

मुंबई पुणे एक्सप्रेवेवर मिसिंग लिंक लवकरच सुरु होणार आहे. मिसिंग लिंकचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मिसिंग लिंक १ मेपासून सुरु केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. यामुळे मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट होणार आहे. जवळपास अर्ध्या तासाचा वेळ वाचणार आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या कामाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर नेहमी वाहतूक कोंडी असते. तसेच अपघाताचे प्रमाणदेखील वाढत आहे. यावर मिसिंग हा चांगला उपाय ठरणार आहे.

या प्रकल्पांना जोडणार (Missing Link to Join Samruddhi Expressway)

पुढील काळात समृद्धी महामार्ग, कोकण कोस्टल रोड, वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना जोडून राज्यात ऍक्सेस कंट्रोल रस्त्यांचे जाळे उभारण्यावर सरकारचा भर असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात ७ ते ८ तासांत पोहोचता येईल, अशी सक्षम दळणवळण व्यवस्था उभारत आहोत, असे त्यांनी सांगितले. दरम्याम हा मिसिंग लिंक टोल फ्री असणार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा देशातील पहिला अॅक्सेस मार्ग ठरला आहे. या मार्गामुळे आयटी, सेवा क्षेत्र, उद्योग आणि रिअल इस्टेटमध्ये मोठी वाढ झाली. मिसिंग लिंकमुळे लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी या पर्यटनस्थळांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरांना फायदा होणार आहे.

मिसिंग लिंक कसा असणार? (Mumbai Pune Expressway Missing Link)

मुंबई पुणे मिसिंग लिंक हा १०.५ किमी लांब असणार आहे. या प्रकल्पात दोन बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीतील १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. हा देशातील सर्वात रुंद पूल असणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेचे अंतर ६ किलोमीटरने कमी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना फूड पॉइझनिंग; जेवणानंतर मुलांना होऊ लागल्या उलट्या

शिक्षणमंत्र्याचा राजीनाम्यानंतर मोदी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; लोकसभेत सादर मांडणार नवं विधेयक

पंढरपूर मंदिर कॉरिडॉरचं काम कधी सुरू होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

मराठी माणसानं पुन्हा दिल्ली जिंकली, अभिजीत भिडला, दिल्लीश्वर झुकले, मराठी मोडेन पण वाकणार नाही

प्रधानांचा राजीनामा, महाराष्ट्रात भूकंप?फडणवीस, शिंदेंना दिल्लीत बोलावणं, फडणवीस शिक्षणमंत्री होणार, राऊतांचा दावा

SCROLL FOR NEXT