Mumbai-Pune Missing Link: मुंबई-पुणेचा जलद प्रवास, झिरो टोल, अपघाताचा धोका कमी, जाणून घ्या मिसिंग लिंकची वैशिष्ट्ये?

Mumbai-Pune Expressway Missing Link Project : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी केली आहे. या प्रकल्पामुळे घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक लागणार आहे. वेगवान आणि सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे.
Mumbai-Pune Expressway  Missing Link Project
Mumbai-Pune Expressway’s missing link project to make travel faster and congestion-free.saam tv
Published On

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मिसिंग लिंकचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ मे रोजी होणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Mumbai-Pune Expressway  Missing Link Project
MHADA: पुण्यात स्वस्तात मस्त घरं! अवघ्या १८ लाखात फ्लॅट; म्हाडाच्या २९५ घरांची विक्री, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, मी स्वतः येथे येऊन कामाची गुणवत्ता तपासली असून काम समाधानकारक झाले आहे. उर्वरित किरकोळ कामे पुढील काही दिवसांत पूर्ण होतील. वेळेत आणि उच्च दर्जाने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या मिसिंग लिंकचे वैशिष्ट्येही सांगितली आहेत.

काय आहेत मिसिंग लिंकचे वैशिष्ट्ये

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या मिसिंग लिंकचे बांधकाम केले आहे.

सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे आहेत.

उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे.

सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो.

७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण

लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे.

मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होईल.

इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात लक्षणीय घट होण्यास मदत

या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसांना प्राधान्य देण्यात येणार

“मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही.

सुमारे ६७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला २०१९ साली मंजुरी देण्यात आली होती.

मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची कार्यक्षमता आणखी वाढणार आहे.

या प्रकल्पातील बोगद्यांना देखील गडकिल्ले आणि कार्ला लेण्याच्या प्रतीकृतीप्रमाणे सजवण्यात आले आहे.

घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक लागणार

वेगवान आणि सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे.

यासह या प्रकल्पामुळे लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान होणार कामाचा दर्जा उत्तम ठेवून ही शिल्प खराब होऊ नयेत याची पुरेशी खबरदारी घेण्यात आली असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com