देशाला मिळणार ६ नवीन बुलेट ट्रेन
अमरावती ते हैदराबाद अन् अमरावती ते चेन्नई बुलेट ट्रेन
मुंबई पुणे बुलेट ट्रेनचा मार्ग प्रस्तावित
देशात रेल्वेचे जाळे वाढत आहे. प्रत्येक राज्य हे रेल्वेमुळे जोडले गेले आहे. त्यात देशातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन लवकरच सुरु केली जाणार आहे. याबाबतच रेल्वेमंत्र्यांनी काल एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता प्रमुख शहरांचा आर्थिक विकास करण्यासाठी प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या नेटवर्कवर काम केले जात आहे. तसेच रेल्वे आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचीही घोषणा केली आहे.
देशात नवीन बुलेट ट्रेन धावणार
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, हा हाय स्पीड रेल्वे प्रकल्प अमरावतीला हैदराबाद, चेन्नई, बंगळुरु आणि मुंबई पुण्याशी जोडण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी होईल. संपूर्ण शहरात एक महत्त्वाचा कॉरिडोर तयार होईल. यामुळे महाराष्ट्र,आंध्र प्रदेश आणि इतर शेजारील राज्ये जोडली जाणार आहे.
रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, बुलेट ट्रेन हा स्वप्नवत प्रकल्प आहे. अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनमुळे हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. ५०० किलोमीटरचे अंतर १ तास ५७ मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळे मुंबई, सुरत, वापी, वडोदरा आणि अहमदाबाद जोडले जाणार आहे. आता असाच प्रकल्प आंध्र प्रदेशमध्येही होणार आहे.
अमरावती ते हैदराबाद फक्त ७० मिनिटांत (Amravati-Hyderabad Bullet Train)
बुलेट ट्रेनचा नवीन अमरावती ते हैदराबाद मार्ग प्रस्तावित आहे.याचसोबत ६ बुलेट ट्रेन सुरु करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ अवघ्या काही मिनिटांवर येणार आहे.
प्रस्तावित बुलेट ट्रेन
अमरावती ते हैदराबाद- ७० मिनिटे (१ तास १० मिनिटे) (Amravati Hyderabad Bullet Train)
अमरावती ते चेन्नई-११२ मिनिटे (१ तास ५२ मिनिटे) (Amravati Chennai Bullet Train)
हैदराबाद ते पुणे- १ तास ५५ मिनिटे (Hyderabad Pune Bullet Train)
पुणे ते मुंबई- ४८ मिनिटे (जवळपास पाऊण तास) (Mumbai Pune Bullet Train)
हैदराबाद-बंगळुरु- २ तास ८ मिनिटे (Hyderabad Bengaluru Bullet Train)
बुलेट ट्रेनबाबत अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, दक्षिण किनारा रेल्वे झोन हा १ जून २०२६ रोजी अधिसूचित केला जाईल. त्यांनी सध्याच्या कोलकत्ता- चेन्नई दुहेरी रेल्वे मार्गाचा विस्तार करणार असल्याचेही सांगितले आहे. यामुळे अनेक बंदरे, पर्यटन स्थळे, सांस्कृतिक केंद्र जोडली जाणार आहे. हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.