

बीडच्या माजलगावात विद्यार्थिनीवर अत्याचार
अश्लील व्हिडिओ बनवून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप
आरोपीच्या व्हिडिओ चॅटिंगमधून फुटले बिंग
योगेश काशिद, साम टीव्ही
बीडच्या माजलगावमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. माजलगावात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. अत्याचारानंतर अश्लील व्हिडिओ बनवून धर्मांतरासाठी दबाव देखील टाकल्याचे उघड झालं आहे. आरोपीच्या व्हिडिओ चॅटिंगमधून धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे. माजलगावातील या विनयभंगाच्या प्रकरणाला नवं वळण मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
माजलगाव शहरातील कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात पीडित मुलीचा कोर्टात जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर नराधमाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. नराधमाने पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हिडिओ बनवून तिला धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे उघडकीस आलं.
माजलगावातील या घटनेमुळे अमरावती पॅटर्नची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे. तालुक्यात सोळा वर्षीय मुलगी माजलगावात अकरावीत शिक्षण घेतेय. तिच्या मैत्रिणीने २० एप्रिल रोजी 'प्रॅक्टिकल बुक' नेली होती. त्यानंतर परत देण्यासाठी मैत्रिणीने बेकर्स लॉज कॅफेजवळ बोलावले होते. तिथे गेल्यावर तिकडे मैत्रीण नव्हती. मात्र, तिथे तिच्या कॉलेजमध्ये शिकणारा अब्दुल नावाचा तरुण होता. त्यावेळी त्याने मुलीचा हात पकडून गैरवर्तन केल्याप्रकरणी विनयभंगाची तक्रार नोंदवण्यात आली.
आता या विनयभंग प्रकरणाला नवं वळण लागल्याने गावात खळबळ उडाली आहे. पीडितेने न्यायालयात अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला. सायबर पोलिसांच्या मदतीने केलेल्या तपासणीत पीडितेचे व्हिडिओ आणि सर्व व्हाट्सअॅप चॅटिंग आढळली. आरोपीने पीडितेवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचेही चॅटिंगमधून समोर आलं. याशिवाय त्याच्या जाळ्यात इतर पाच ते सहा मुली अडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणावर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांनी महत्वाची माहिती दिली. 'आधी विनयभंग आणि आता अत्याचाराचे कलम वाढवण्यात आले आहे. व्हिडिओ चॅटिंगबाबत सर्व माहिती तपास अधिकाऱ्यांकडे आहे. या संदर्भात तपास अधिकारी अधिक तपास करत आहेत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.