Mumbai Pune Expressway: Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्ग पाण्याखाली, कमरेइतक्या पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ; वाहतूक होणार ठप्प?

Mumbai Pune News: अतिपावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात पाण्यातून वाहनचालक मार्ग काढत पुढे सरकत असल्याचं दिसत आहे.

Satish Kengar

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

राज्यभरात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. यातच मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पाण्यात जाणार का, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचा एक भयंकर व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओत कमरेइतके पाणी या एक्स्प्रेसवेवर साचलेलं दिसत आहे. खोपोलीजवळ बोरघाटात अमृतांजन पुलाजवळ कमरेइतके पाणी साचलं आहे आणि इतक्या पाण्यातून वाहनचालक मार्ग काढत पुढे सरकत आहेत. यातच पावसाचा जोर आणखी वाढला तर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे कधीही बंद होऊ शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली, लोणावळा आणि खालापूर परिसरात प्रचंड पाऊस पडत आहे. खोपोली आणि परिसरात २०९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. याचाच हा परिणाम आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच एक्स्प्रेसवेवर पाणी साचलं आहे. याचा फटका वाहनचालकांना बसतोय.

यातच एक्स्प्रेसवेवर साचलेल्या पाण्याचा व्हिडिओ पाहिला तर दोन ते अडीच फुटांपेक्षा जास्त पाणी येथे साचलं आहे. याठिकाणी सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस उपस्थित आहेत. मात्र एक्स्प्रेसवेवरील ट्राफिक आणि वाहनांचा वेग लक्षात घेता वाहनं थांबवणं कठीण झाल्याचं दिसत आहे.

चिंचवली बोरकर पूल पाण्याखाली

दरम्यान, मुंबई गोवा महामार्ग लगत असणाऱ्या चिंचवली येथील चिंचवली बोरघर मार्ग देखील संततदार कोसळणाऱ्या पावसामुळे नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने पाण्याखाली गेला आहे. यामुळे चिंचवली गावाचा खेड तालुक्यातील इतर गावांची संपर्क पूर्णपणे तुटला असून खेड तालुका प्रशासन याकडे लक्ष ठेवून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांची रांग

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

SCROLL FOR NEXT