काँग्रेस नेते गौरव गोगोई यांना लोकसभेत पक्षाचे उपनेते म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबाबतचे पत्र अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवण्यात आले आहे. एआयसीसी संघटनेचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
वेणुगोपाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून लोकसभेत काँग्रेस पक्षाचे उपनेते, मुख्य व्हीप आणि दोन व्हिप यांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे.''
गौरव गोगोई हे लोकसभेत पक्षाचे उपनेते असतील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, केरळचे आठ वेळा खासदार राहिलेले कोडीकुन्नील सुरेश हे पक्षाचे मुख्य व्हिप असतील. अधिक माहिती देताना के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, विरुधुनगरचे खासदार मणिकम टागोर आणि किशनगंजचे खासदार मोहम्मद जावेद लोकसभेत पक्षाचे व्हिप असतील.
याआधी पक्षाने राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. वेणुगोपाल म्हणाले, "विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्ष लोकसभेत जनतेचे प्रश्न पूर्ण शक्तीने मांडतील."
दरम्यान, लोकसभेत पक्षाचे उपनेते म्हणून नियुक्त झाल्यानंतर गौरव गोगोई यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात ते म्हणाले आहे की, "माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल आदरणीय काँग्रेस संसदीय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांचा मी आभारी आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.